भक्तीचा तेज-सेवाभावाची ओळख,ह.भ.प.राजु महाराज लोखंडे /पत्रकार अण्णासाहेब साबळे यांचा मच्छिंद्रनाथ देवस्थानात गौरवपूर्ण सत्कार
आष्टी (प्रतिनिधी --गोरख मोरे ) :
आष्टी तालुक्यातील सावरगाव येथील मच्छिंद्रनाथ महाराजांच्या पवित्र नगरीत भक्ती, श्रद्धा आणि सेवाभावाचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळाला असून मच्छिंद्रनाथ देवस्थान दर्शनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध ह.भ.प.राजु महाराज लोखंडे आणि प्रामाणिक व जनतेच्या समस्यांना आवाज देणारे पत्रकार अण्णासाहेब साबळे यांचा देवस्थान ट्रस्टतर्फे गलब व श्रीफळ देऊन मानाचा सत्कार करण्यात आला.
या सोहळ्यात देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दादासाहेब चितळे आणि सचिव बाळासाहेब मस्के यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या प्रसंगी समाजसेवक बबनराव शिंदे,पोपट जाधव यांच्यासह अनेक भक्तजन उपस्थित होते.
सत्कारावेळी उपस्थितांनी राजु महाराज लोखंडे यांच्या सहवासातून लाभलेल्या अध्यात्मिक अनुभवांचा, तसेच ५० वर्षांपूर्वी व ५० वर्षांनंतरही अचूक भाकीत सांगणाऱ्या त्यांच्या तर्कशक्तीचा गौरव करण्यात आला असून पत्रकार अण्णासाहेब साबळे यांच्या सामाजिक बांधिलकी, निःस्वार्थ पत्रकारिता आणि लोकहितासाठीच्या कार्याचे सर्वांनी कौतुक केले.
या प्रसंगी मच्छिंद्रनाथ देवस्थानात भक्ती,श्रद्धा आणि सेवेचा दिव्य संगम दिसुन आला असून वातावरणात भक्तीचा सुगंध दरवळत असताना उपस्थितांनी जय मच्छिंद्रनाथ!च्या घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाल्याचे दिसून आले.
Comments
Post a Comment