शेतकऱ्यांच्या नुकसानिच्या पंचनाम्यात वेळ घालण्यापेक्षा बीड जिल्हा ओला दुष्काळ जाहिर करुन शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्या -भाई विष्णुपंत घोलप
पाटोदा (प्रतिनिधी) अतिवृष्टीने बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खरीप पिकाचे अतुनात नुकसान झालेले असुन काहींची जनावरे विज पडुन मेलेली असुन काही मनुष्य हानी झालेली आहे. आता शासनाने पंचनाम्यात वेळ घालण्यापेक्षा बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहिर करावा आणि शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी असे भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे बीड जिल्हा चिटणीस भाई विष्णुपंत घोलप, आष्टी-पाटोदा-शिरुर विधानसभा चिटणीस भाई शिवाजीराव सुरवसे,भाई नारायण थोरवे,भाई रमेशचंद्र देशमाने यांना उपविभागीय अधिकारी कार्यालय पाटोदा यांच्या मार्फत जिल्हाधिकारी बीड यांना लेखी निवेदनाव्दारे कळविले आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीन काही चिखलात आहेत, काहींनी काढणी केली त्यांचे बुचाडे सडले आहेत,काहींनी काढणी केली पण जमा केलेले नाही ते सोयाबीन काळी पडली आहे, तसेच कापसाच्या संदर्भात कापसाच्या पहिल्या वेचणीच्या वाती सततच्या पावसामुळे झाल्या आहेत, शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्यामुळे कापसाची मुळे सडली आहेत,काही कापसाची बोंडे पाण्यामध्ये खराब झाली आहेत, तुर पीकाला जास्त पाऊस जमत नाही.रब्बी ज्वारी पेरणी एक महिना उलटुन गेला तरी अध...