बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : - जनप्रहार सामाजिक संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन


बीड प्रतिनिधी :बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात यंदा ऑगस्ट महिना संपला तरी मागील वर्षाच्या तुलनेत पुरेसा पाऊस झालेला नाही. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात तात्काळ 'कोरडा दुष्काळ' जाहीर करून पिकांचे पंचनामे करावेत व आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जनप्रहार सामाजिक संघटना (महाराष्ट्र राज्य) च्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय गायकवाड आणि सचिव ॲड. सदानंद वाघमारे यांच्या स्वाक्षरीचे निवेदन बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले.या वेळी मोठ्या संख्येने संघटनेचे पदाधिकारी उपस्थितीत होते.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी