ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा गौरव ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यातर्फे विशेष कार्यक्रम

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा गौरव ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यातर्फे विशेष कार्यक्रम

[ अविनाश देशमुख शेवगांव ] 9960051755 7219491445

दिनांक 13 सप्टेंबर 2026 वार रविवार प्रतिनिधी ~ यां बाबत सविस्तर वृत्त असे की लोकनेते स्व. मारुतरावजी घुले पाटील यांच्या ९६व्या जयंती निमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कारखाना कार्यक्षेत्रात ऊस शेतीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा गौरव करण्यासाठी लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना लि., ज्ञानेश्वरनगर यांच्या वतीने विशेष गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
कारखान्याचे संस्थापक व परिसराचे भाग्यविधाते लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांच्या ९६व्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ऊस उत्पादनात उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या योगदानाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
मंगळवार, दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता नागेबाबा भक्त निवास, भेंडा बु.।।, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर येथे हा गौरव समारंभ होणार आहे.
कार्यक्रमाचे शुभहस्ते गरुडबुवा महंत ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक (नेवासकर) यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. आ. डॉ. नरेंद्रजी घुले पाटील, चेअरमन, लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना लि. हे राहणार आहेत.
कार्यक्रमास मा. आ. श्री. चंद्रशेखर घुले पाटील, मा. आ. श्री. पांडुरंग अभंग, मा. ॲड. श्री. सुरेशजी आमचा देशमुख तसेच मा. श्री. काकासाहेब नरवडे पा. यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
🌾 शेतकऱ्यांच्या कष्टाला सन्मानाची सलामी!
ऊस उत्पादन वाढविण्यासाठी आधुनिक शेती तंत्रज्ञान, मेहनत आणि सातत्याने प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव हा केवळ सत्कार नसून त्यांच्या कष्टाला मिळणारी मानाची पावती ठरणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी आणि सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
“ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा गौरव, शेतकऱ्यांच्या कष्टाला मानाचा मुजरा!” अशा भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास परिसरातील नागरिक, ऊस उत्पादक शेतकरी व सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राजमाणनीय संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी