क्रांतिकारी भीमसैनिक भाई राजेशकुमार जोगदंड यांचा भारतीय दलित पॅंथर च्या वतीने परळी येथे भव्य सत्कार संपन्न



परळी८(प्रतिनिधी)
भारतीय दलित पॅंथर महाराष्ट्र राज्य. बीड जिल्हा. परळी तालुका व शहर शाखेच्या वतीने शासकीय विश्रामगृह परळी वै.जिल्हा. बीड येथे 5 सप्टेंबर 2026 शिक्षक दिनानिमित्त व भारतीय दलित पॅंथर च्या वर्धापन दिनानिमित्त बीड जिल्ह्यातील कंत्राटी सफाई कामगारांचे न्याय हक्क मिळवुन देण्यासाठी कामगार नेते भाई राजेशकुमार जोगदंड यांनी मागील ७ वर्षांपासुन सातत्याने कायदेशीर सनदशीर मार्गाने विविध प्रकारचे आंदोलने तसेच जिल्हा सह आयुक्त नगर परीषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर सलग १८ दिवस अन्नत्याग उपोषण करुन न्याय मिळवुन देण्यासाठी संघर्ष केला . भाई राजेशकुमार जोगदंड यांच्या आई विमल यांच्या सह खुशालराव जोगदंड यांचाही संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला त्यांनी सर्वांचे मन:पुर्वक आभार व्यक्त केले . सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ. प्रा.माधव रोडे सर, हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भारतीय दलित पॅंथरचे मराठवाडा महासचिव गौतम आगळे हे होते, कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सिद्धार्थ शिंगारे अजय सरवदे प्रेम कांबळे, चर्मकार महासंघाचे राज्य प्रवक्ते रोहिदास बनसोडे,अनिलराव मस्के, आदी मान्यवर उपस्थित होते. 
सदर कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन भारतीय दलित पॅंथर चे बीड जिल्हाध्यक्ष वैजनाथ गायकवाड यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष माणिकराव बनसोडे यांनी केले.तर आभार प्रदर्शन भारतीय दलित पॅंथरचे शहर अध्यक्ष धम्मदीप रोडे यांनी केले आहे.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहर उपाध्यक्ष दत्ता रायभोळे,जतीन जगतकर, विलास गायकवाड, योगेश मुंडे यांनी परिश्रम केले अशी माहिती या प्रसिद्धी पत्रका द्वारे दिली आहे .

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी