गोरगरीब कुटुंबांना ‘एक हात मदतीच्या’ उपक्रमातून किराणा कीटचे वाटप
गोरगरीब कुटुंबांना ‘एक हात मदतीच्या’ उपक्रमातून किराणा कीटचे वाटप
बीड प्रतिनिधी :
सामाजिक बांधिलकी जपत ‘एक हात मदतीचा’ या विशेष उपक्रमाअंतर्गत गरजू व गोरगरीब कुटुंबांना किराणा कीटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात लोकशाही पत्रकार संघाचे श्री. बी. बी. वैद्य, गुरु आनंद महिला प्रतिष्ठान व लोकशाही पत्रकार संघ सामाजिक कार्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्ष सीमाताई ओस्तवाल आणि सुजाता मॅडम यांच्यासह लोकशाही पत्रकार संघाचे सर्व पत्रकार बंधू हिरिरीने सहभागी झाले होते.
समाजातील दुर्बल घटकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व मान्यवरांच्या आणि पत्रकारांच्या हस्ते प्रत्यक्ष कुटुंबांना भेटून दैनंदिन गरजेच्या वस्तू व किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.
पत्रकार केवळ बातम्यांपुरते मर्यादित न राहता सामाजिक कार्यातही नेहमी पुढे असतात, हेच या उपक्रमातून पुन्हा एकदा दिसून आले. या उपक्रमाबद्दल स्थानिक नागरिकांनी आणि लाभार्थी कुटुंबांनी आयोजक व सर्व पत्रकार बांधवांचे मनापासून आभार मानले.
Comments
Post a Comment