बीड नगर परिषदेतर्फे तारांगण व विज्ञान उद्यान प्रकल्पाचे ऑनलाइन भूमिपूजन- शेख निजाम

बीड नगर परिषदेतर्फे तारांगण व विज्ञान उद्यान प्रकल्पाचे ऑनलाइन भूमिपूजन- शेख निजाम 
बीड | प्रतिनिधी
बीड शहराच्या विकासामध्ये महत्त्वाची व अजितदादा पवार यांनी दिलेले शब्द साकार करण्यासाठी बीड शहराचया वैभवात भर घालणाऱ्या आ़ विजयसिंह पडीत यांच्या पाठपुरावाने होत असलेल्या तारांगण व विज्ञान उद्यान प्रकल्पाचे (ऑनलाइन) भूमिपूजन सोहळा गुरुवार, १७ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. बीड नगर परिषद प्रशासनाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
रेल्वे स्थानक, पालवण रोड, बीड येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या कार्यक्रमाच्या उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ गंगाबाई संभाजी शिंदे यांच्यासह पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजाताई मुंडे यांची प्रमुख व शुभहस्ते कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती
आमदार व माजी मंत्री धनंजय मुंडे साहेब, आमदार प्रकाश दादा साळुंके, आमदार विजयसिह पंडित, राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे जिल्हाअध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण, नगरअध्यक्ष प्रेमलता ताई पारवे उपस्थित राहणार आहेत.
विद्यार्थ्यांसाठी विज्ञानाधारित 
सुविधा बीड शहरात तारांगण आणि विज्ञान उद्यान उभारण्याचा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी तसेच विज्ञानप्रेमी नागरिकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे खगोलशास्त्र, विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवाच्या माध्यमातून माहिती मिळण्यास मदत होऊ शकते.

बीड शहरातील विद्यार्थी, विज्ञान व संशोधनप्रेमी नागरिकांसाठी सायन्स पार्क आणि तारांगण उभारण्याच्या प्रस्तावाला यापूर्वी मान्यता मिळाल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले आहे. 
शहराच्या विकासात आणखी एक महत्त्वाची भर व अजित दादा पवार यांनी दिलेले शब्द पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री सुनेत्राताई पवार हे दिलेल्या सर्व शब्द पूर्ण करत आहेत 
बीड शहरातील विज्ञान उद्यान आणि तारांगण हा शहराच्या विकासाशी संबंधित महत्त्वाचा उपक्रम मानला जात आहे. या विकासाच्या कामात शहरातील लोकप्रतिनिधी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आव्हान सभापती शेख निजाम यांनी केले आहे
यापूर्वी बीड जिल्ह्यातील विविध विकासकामांमध्ये विज्ञान उद्यान व तारांगण पार्कचा समावेश करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक कार्यक्रमात देण्यात आली होती.
कार्यक्रमाची तारीख : गुरुवार, १७ सप्टेंबर २०२६
स्थळ : रेल्वे स्थानक, पालवण रोड, बीड

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी