लिंबागणेश येथे आठवडी बाजारासह कडकडीत बंद; मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा

लिंबागणेश येथे आठवडी बाजारासह कडकडीत बंद; मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा

 छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने  : डॉ. गणेश ढवळे
लिंबागणेश : (दि. ३)मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी दि. २९ ऑगस्टपासून अंतरवली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले असून आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे. उपोषणामुळे मनोजदादा जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असल्याने सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे दुकानदार व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत कडकडीत बंद पाळला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात लिंबागणेशकरांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

“जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है”, “एक मराठा, लाख मराठा”, “आरक्षण आमच्या हक्काचे” " मराठा समाजाची फसवणूक करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो" अशा घोषणा देत निदर्शने करून आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्यात आला. यावेळी समाज बांधव सहभागी होते 

 सरकारच्या भूमिकेमुळे मराठा समाजात तीव्र असंतोष : डॉ. गणेश ढवळे

गेल्या काही वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोजदादा जरांगे पाटील प्राणांतिक उपोषणे व विविध आंदोलने करत आहेत. आंदोलनाच्या प्रत्येक टप्प्यावर सरकारच्या प्रतिनिधींकडून आश्वासने दिली जातात; मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या बाबतीत ठोस निर्णय होत नसल्याने मराठा समाजामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

सरकारने केवळ आश्वासनांची खैरात न करता मराठा समाजाच्या मागण्यांवर ठोस व सकारात्मक निर्णय घ्यावा. भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सरकारने तातडीने हस्तक्षेप करून मनोजदादा जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवावे, अशी मागणी मराठा सेवक डॉ. गणेश ढवळे, लिंबागणेशकर यांनी केली.

यावेळी स्थानिक दुकानदार, व्यापारी, व्यावसायिक, नागरिक व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 गुरुवारचा आठवडी बाजार सोमवारी भरणार

बीड जिल्हा बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत लिंबागणेश येथे दर गुरुवारी भरविण्यात येणारा आठवडी बाजार आज बंद ठेवण्यात आला. पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर हा आठवडी बाजार सोमवारी भरविण्यात येणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांना देण्यात आली आहे.

लिंबागणेश येथील किरकोळ व घाऊक व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, विविध व्यावसायिक तसेच शाळांनीही बंदमध्ये सहभाग नोंदवत आंदोलनाला पाठिंबा दिला.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी