शिक्षक कवी डॉ गवाजी बळीद यांच्या "निसर्गाचे संविधान "या कवितेला प्रथम काव्यलेखन पुरस्कार
शेवगाव तालुक्यातील चापडगाव जिल्हा परिषद केंद्रशाळेचे शिक्षक कवी डॉ गवाजी बळीद यांना एसआर दळवी फाऊंडेशन नवी मुंबई व अहिल्यानगर टिचर फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सृष्टीसंवर्धन या ध्येयाने प्रेरित शिक्षकांसाठी आयोजित हरित भारताचे स्वप्न व वसुंधरेसाठी स्वातंत्र्य या विषयांवर स्वरचित काव्यलेखन स्पर्धेत " निसर्गाचे संविधान " या कवितेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला .
अहिल्यानगर येथील हॉटेल सुवर्णम प्राईड येथील वातानुकुलीत प्रशस्त हॉलमध्ये आयोजित विशेष पुरस्कार वितरण सोहळ्यात एसआर दळवी फाऊडेंशनचे सर्वेसर्वा मा रामचंद्र दळवी व सीताताई दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली एसआर दळवी फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष मा .सतीश मुन्तोडे राजकुमार बनसोडे, रूपचंदजी शिदोरे, शिक्षक गुणवंत बुधवंत संदीप रासकर आदि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रसिद्ध गझलकार अभिनेते रज्जाकभाई शेख यांच्या हस्ते कवी डॉ गवाजी बळीद यांना सन्मानपत्र , सन्मानचिन्ह , मानाचा फेटा बांधून सन्मानित करण्यात आले . या यशाबद्दल गटविकासाधिकारी मा महेश दहिफळे ,गटशिक्षणाधिकारी मा शैलजा राऊळ, बोधेगाव बीटाचे शिक्षण विस्ताराधिकारी डॉ शंकर गाडेकर ,संचालक मा रमेश गोरे , केंद्रप्रमुख सोपानराव डांगे, मुख्याध्यापक तुकाराम भगत सहकारी शिक्षक दादासाहेब चव्हाण ,बाबासाहेब हरदास ,रविंद्र घनवट ,मंजुश्री खंडागळे ,पुनम राऊत ,दत्तात्रय सुरवसे यांच्यासह समस्त अधिकारी ,पदाधिकारी, ग्रामस्थ, विद्यार्थी व पंचक्रोशीतील सर्व स्तरातील नागरिकांनी कवी डॉ गवाजी बळीद यांचे विशेष अभिनंदन केले आहे .
Comments
Post a Comment