पाटोद्यात कुणबी प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिर संपन्न; महसूल विभागाकडून नागरिकांना मार्गदर्शन
पाटोदा (प्रतिनिधी) कुणबी-मराठा तसेच मराठा-कुणबी पात्र नागरिकांना जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवून देण्याची प्रक्रिया सुलभ व जलदगतीने पूर्ण व्हावी, यासाठी बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत दि. 16 सप्टेंबर 2026 रोजी पाटोदा नगरपंचायतीच्या सभागृहात, पाटोदा येथे विशेष शिबिर संपन्न झाले.
या शिबिरास नायब तहसीलदार जोशीसाहेब उपस्थित होते. यावेळी पात्र नागरिकांच्या कुणबी नोंदींचा शोध घेणे, उपलब्ध पुराव्यांची पडताळणी करणे, अर्ज स्वीकारणे तसेच प्रमाणपत्र प्रक्रियेसाठी आवश्यक कार्यवाही करण्यात आली.पाटोदा महसूल मंडळातील पात्र नागरिकांनी कुणबी नोंदी, जुने दस्तऐवज व इतर उपलब्ध पुराव्यांसह आवश्यक कागदपत्रे घेऊन शिबिरात सहभाग घेतला. नागरिकांना कुणबी प्रमाणपत्रासाठी आवश्यक प्रक्रिया, कागदपत्रे आणि पुढील कार्यवाहीबाबत महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरामुळे पात्र नागरिकांना कुणबी प्रमाणपत्राच्या प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या नोंदी व कागदपत्रांची पडताळणी करून घेण्याची सुविधा उपलब्ध झाली. संबंधित नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्यावर आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली. शिबिराच्या आयोजनासाठी मंडळ अधिकारी अशोक दराडे तसेच तलाठी अभिजीत देशमुख, भारती दांडगे, राहुल भरणे, ज्ञानेश्वर काकडे आणि गोविंद मुंडे, शेवाळे माणिक, माने मँडम, श्रीहरी वाघ, मच्छिंद्र राऊत,यांनी आवश्यक कार्यवाही केली.पात्र नागरिकांना प्रमाणपत्र प्रक्रियेत अडचण येऊ नये आणि उपलब्ध नोंदींच्या आधारे आवश्यक कार्यवाही वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी महसूल विभागाकडून शिबिराच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करण्यात आले.
Comments
Post a Comment