खंडेश्वरी माता मंदिर खिंड रस्त्याच्या विकासकामास सुरवात ; २१ सप्टेंबरला भव्य उद्घाटन

खंडेश्वरी माता मंदिर खिंड रस्त्याच्या विकासकामास सुरवात ; २१ सप्टेंबरला भव्य उद्घाटन
​बीड प्रतिनिधी : बीड शहराचे ग्रामदैवत श्रीक्षेत्र खंडेश्वरी मातेच्या मंदिराकडे जाणाऱ्या एमआयडीसी ते खिंड रस्त्याच्या विकासकामास प्रत्यक्ष सुरुवात झाली असून, आज नाली कामाचा प्रारंभ करण्यात आला. येत्या सोमवारी, २१ सप्टेंबर रोजी आमदार विजयसिंह पंडित यांच्या हस्ते व नगराध्यक्ष प्रेमलताताई पारवे यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत या रस्त्याचे अधिकृत उद्घाटन होणार असल्याची माहिती नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी दिली.
​आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात ये-जा करणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता, नागरिक व वाहनधारकांची गैरसोय टळावी म्हणून हे काम युद्धपातळीवर पूर्ण केले जात आहे.
​ या मार्गावर नवीन काँक्रीट रस्ता तयार केला जाणार असल्याने वाहतूक अधिक सुरक्षित व सुकर होईल. रस्त्याच्या कडेला आणि मोकळ्या जागेवर कचरा टाकण्याला आळा बसून परिसराचे सौंदर्य टिकून राहण्यास मदत होईल. पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हावा यासाठी नालीचे काम प्राधान्याने हाती घेण्यात आले आहे.
​या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, गटनेते फारुख पटेल, शेख मुजीब भाई, नगरसेवक अश्फाक इनामदार, खंडेश्वरी संस्थानचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित राहणार आहेत. नगरपरिषदेच्या माध्यमातून मंदिराकडे जाणारा हा मुख्य मार्ग स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे नाईकवाडे यांनी स्पष्ट केले.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी