वाढदिवसानिमित्त ११० रक्तदात्यांचे रक्तदान; श्री.जयकुमार गोरे साहेब वैद्यकीय मदत कक्षाच्या सेवाकार्याला सलाम



बीड | प्रतिनिधी

आज दि.०९ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री श्री. जयकुमार गोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री. जयकुमार गोरे साहेब वैद्यकीय मदत कक्ष, बीड विभागाच्या वतीने स्वपनील वरपे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जीवनदायी ब्लड बँक, बीड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत तब्बल ११० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

गेल्या वर्षभरापासून श्री.जयकुमार गोरे साहेब वैद्यकीय मदत कक्ष गोरगरीब, गरजू आणि अडचणीत असलेल्या रुग्णांसाठी आधारवड ठरत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे उपचारापासून कोणताही रुग्ण वंचित राहू नये, यासाठी श्री. जयकुमार गोरे साहेब वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून रुग्णांच्या कागदपत्रांचा सातत्याने पाठपुरावा करून शासकीय योजनांमधून उपचारासाठी निधी मंजूर करून देणे, तसेच विविध शासकीय योजना व धर्मादाय संस्थांच्या माध्यमातून गरजू रुग्णांची मोफत ऑपरेशन्स करून देणे, अशा विविध पातळ्यांवर मदत केली जात आहे.

यासोबतच गरजू रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध करून देणे, उपचारासाठी आवश्यक मार्गदर्शन करणे आणि रुग्णांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, अशी अनेक समाजोपयोगी कामे जयकुमार गोरे साहेब वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून सातत्याने सुरू आहेत.

“रुग्ण हा केवळ रुग्ण नसून आपल्या कुटुंबातीलच एक सदस्य आहे” या भावनेतून काम करणाऱ्या श्री.जयकुमार गोरे साहेब वैद्यकीय मदत कक्षाच्या सेवाभावी कार्याला आजच्या रक्तदान शिबिरातून आणखी एक नवी दिशा मिळाली आहे.

वाढदिवसाच्या निमित्ताने स्वतःसाठी उत्सव साजरा करण्याऐवजी ११० रक्तदात्यांना प्रेरित करून रक्तदानाचा उपक्रम राबविण्याचा स्वपनील वरपे पाटील यांचा संकल्प सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरला आहे.

“एक फोन मदतीसाठी… आणि एक जीव वाचविण्यासाठी!”

गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी, त्यांच्या हक्काच्या उपचारासाठी आणि संकटाच्या काळात मदतीचा हात देण्यासाठी श्री. जयकुमार गोरे साहेब वैद्यकीय मदत कक्ष सदैव तत्पर..!

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी