लिंबागणेश येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक संपन्न
लिंबागणेश येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक संपन्न
शिस्त व सौहार्द राखत शांततेत सण साजरे करा : सपोनि मंगेश साळवे
लिंबागणेश : (दि. ०९) आगामी गणेशोत्सव सण आनंदात, उत्साहात आणि शांततेत साजरे व्हावेत, यासाठी ग्रामस्थांनी कायदा व सुव्यवस्था तसेच सामाजिक सलोखा अबाधित ठेवावा, असे आवाहन नेकनूर पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश साळवे यांनी केले.
बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील ग्रामपंचायत कार्यालयात आज दि.०८ रोजी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून सपोनि मंगेश साळवे बोलत होते. बैठकीचे प्रास्ताविक डॉ. गणेश ढवळे यांनी केले. यावेळी लिंबागणेश पोलिस चौकीचे सहाय्यक फौजदार राठोड,पोलीस हवालदार मंसुर शेख, पोलिस हवालदार मुंडे उपस्थित होते.
यावेळी बोलताना सपोनि मंगेश साळवे म्हणाले की, “गणेशोत्सव हा श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकोप्याचा सण आहे. प्रशासन व गणेश मंडळांनी परस्पर समन्वयाने उत्सव सुरळीत पार पाडावा. यावर्षी राज्य पातळीवर गणेशोत्सव महोत्सव म्हणून साजरा होत असल्याने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती, निर्माल्य विसर्जन आणि स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे.”
गणेश मंडळांनी आवश्यक ऑनलाईन परवानगी घेऊनच गणपतीची स्थापना करावी. ध्वनीक्षेपक, विद्युत रोषणाई आणि इतर साधनांचा वापर शासनाने व प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांनुसारच करावा. ध्वनी प्रदूषणामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच आजारी व्यक्तींना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच विद्युत सुरक्षेसह वाहतूक व्यवस्थेचे काटेकोर पालन करावे, असेही त्यांनी सांगितले.
“गणेशोत्सव सामाजिक एकात्मता व बंधुभावाचा संदेश देणारे आहेत. त्यामुळे सर्वांनी जबाबदार नागरिक म्हणून संयम, शांतता आणि सौहार्द कायम ठेवत सण उत्साहात साजरे करावेत,” असे आवाहन सपोनि मंगेश साळवे यांनी केले.
बैठकीस सरपंच बालासाहेब जाधव, राजाभाऊ गिरे, बाळासाहेब मुळे, ,बाळकृष्ण थोरात,चिंतामण जोशी, श्रीकांत जोशी,वरद जोशी, श्रीहरी निर्मळ, रमेश गायकवाड, गणपत तागड, विक्रांत वाणी, रामकिसन गिरे,अभिजित गायकवाड, अशोकराजे वाणी, संतोष भोसले, सुरेश ढवळे, सुरज कदम, चेतन कानिटकर,शुभम कोकाटे, स्वप्निल निर्मळ, बंडु बागल, गणेश थोरात , निलेश शिंदे पत्रकार हरिओम क्षीरसागर यांच्यासह गणेश मंडळांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment