जरांगे पाटलांच्या समर्थनात पाटोदा कडकडीत बंद
जरांगे पाटलांच्या समर्थनात पाटोदा कडकडीत बंद
सर्वधर्मीयांचा उत्स्फूर्त पाठिंबा; मराठा आरक्षणाच्या मागणीला शहरातून जोरदार समर्थन
पाटोदा (प्रतिनिधी) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज पाटोदा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील व्यापारी, दुकानदार, नागरिक तसेच विविध समाजघटकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली.
सकाळपासूनच पाटोदा शहरातील प्रमुख बाजारपेठेसह विविध भागांमध्ये बंदचा परिणाम जाणवला. नेहमी गजबजलेल्या रस्त्यांवर तुलनेने शांतता दिसून आली. मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी सर्वधर्मीय व विविध समाजघटक एकवटल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.बंददरम्यान आंदोलनकर्त्यांकडून शांततेच्या मार्गाने आपला निषेध व्यक्त करण्यात आला. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन मागणीची तातडीने दखल घ्यावी, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.पाटोद्यातील या बंदला व्यापारी वर्गासह नागरिकांनी दिलेला प्रतिसाद लक्षवेधी ठरला. एकजुटीने दिलेला हा बंदचा संदेश शासनापर्यंत पोहोचावा आणि आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा, अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
Comments
Post a Comment