महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना बस प्रवासात मिळणारी सवलत ही सामाजिक कल्याणाच्या उद्देशाने असते. त्यामुळे “कार्ड नाही, तर सवलत नाही” हे बरं नव्हं - बाजीराव ढाकणे

महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना बस प्रवासात मिळणारी सवलत ही सामाजिक कल्याणाच्या उद्देशाने असते. त्यामुळे “कार्ड नाही, तर सवलत नाही” हे बरं नव्हं - बाजीराव ढाकणे
बीड प्रतिनिधी. :-  महिला व ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासातील सवलतीचा लाभ घेण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या धोरणाविरोधात आज बीड येथे जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आणि परिवहन मंत्री यांना निवेदन देण्यात आले यावेळी डॉ संजय तांदळे,प्राचार्य डी जी तांदळे, महा एनजिओ फेडरेशन चे बीड जिल्हा समन्वयक बाजीराव ढाकणे यांची उपस्थिती होती.
स्मार्ट कार्ड च्या सक्तीमुळे आता नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून, शासनाने तातडीने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी बाजीराव ढाकणे यांनी केली आहे.

महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना बस प्रवासात देण्यात येणारी सवलत ही सामाजिक कल्याणाच्या उद्देशाने दिली जाते. त्यामुळे “कार्ड नाही, तर सवलत नाही” हे बरं नव्हं 

“स्मार्ट कार्ड हा प्रवाशांसाठी पर्याय असावा; पात्र नागरिकांच्या सवलतीवर लादलेली सक्तीची अट नसावी.”

कार्ड हरवले, खराब झाले, रिचार्ज झाले नाही, सर्व्हर बंद राहिला किंवा तांत्रिक अडचण आली तर त्या दिवशी पात्र महिला अथवा ज्येष्ठ नागरिकाने पूर्ण तिकीट का भरावे? या प्रश्नाचे उत्तर शासनाने जनतेला द्यावे, अशी मागणी केली.

- कार्ड नसतानाही पात्र महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीचा लाभ देण्याची व्यवस्था ठेवावी.


जनतेला त्रास देणारे धोरण आम्ही रेटू देणार नाही!”

“सरकारने जनतेच्या खिशाचा आणि वेळेचा विचार केला पाहिजे. गरीब, ग्रामीण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी समजून न घेता वातानुकूलित कार्यालयात बसून धोरणे ठरविणे थांबवा. महाराष्ट्रातील सामान्य नागरिकाला सुविधा हव्या आहेत, सक्ती आणि रांगा नकोत,” असा घणाघाती हल्ला श्री. बाजीराव ढाकणे यांनी केला.

“एसटी ही जनतेची सेवा आहे; ती केवळ डिजिटल व्यवहार करणाऱ्या नागरिकांसाठी नाही. स्मार्ट कार्डच्या नावाखाली महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीवर गदा आणली, रोख तिकीट व्यवस्था बंद केली किंवा नागरिकांची आर्थिक व मानसिक कुचंबणा केली, तर या निर्णयाविरोधात राज्यभर जनजागृती करून लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारले जाईल,” असा इशारा दिला आहे.

सरकारने तातडीने संबंधित निर्णयाचा पुनर्विचार करून “सवलत कायम ठेवा, रोख तिकीट कायम ठेवा आणि स्मार्ट कार्ड ऐच्छिक ठेवा”, अशी मागणी केली आहे.

जनतेचा सरकारला स्पष्ट संदेश —

“सुविधा द्या, सक्ती नको!
सवलत द्या, अडथळे नको!
एसटी जनतेची आहे; जनतेची गैरसोय करणारे धोरण नको

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी