अनंत इंगळे यांना राज्यस्तरीय ‘समाजरत्न’ पुरस्कार प्रदान
अनंत इंगळे यांना राज्यस्तरीय ‘समाजरत्न’ पुरस्कार प्रदान
सामाजिक कार्याची दखल; मान्यवरांच्या हस्ते सन्मान
परळी (प्रतिनिधी) – राष्ट्रसंत गाडगेबाबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय ‘समाजरत्न’ पुरस्कार नगरसेवक अनंत इंगळे यांना प्रदान करण्यात आला. संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त स्व. लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर, परळी येथे आयोजित भव्य कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते त्यांना समर्थचिन्ह, प्रमाणपत्र, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
अनंत इंगळे हे सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून, सर्वसामान्य व गरजू नागरिकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतात. आर्या तशाराच्या चळवळीत सक्रिय सहभाग, विविध सामाजिक उपक्रमांमध्ये पुढाकार आणि नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते भीम महोत्सव व अशा अनेक समाज उपयोगी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय ठरले आहे. समाजहितासाठी धावून जाणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
त्यांच्या या कार्याची राज्यस्तरावर दखल घेत सन्मान करण्यात आल्याने परळी शहरासह परिसरात आनंदाचे वातावरण आहे. प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस, सहाय्यक आयुक्त मा. विशालजी लोंढे,ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे हस्ते प्रधान व अभिनंदन करून पुढील सामाजिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
अनंत इंगळे यांना मिळालेला हा ‘समाजरत्न’ पुरस्कार त्यांच्या निस्वार्थ सेवाभावाची पावती असून, भविष्यातही ते समाजहितासाठी अधिक जोमाने कार्य करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सचिव पृथ्वी शिंदे , पत्रकार विकास वाघमारे, सुशिल पोटभरे, रोहित झिंजुर्डे, राहुल सूर्यवंशी , विशाल डोंबे , महेश मुंडे, आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment