लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्रात नेत्र तपासणी शिबिर; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लिंबागणेश:- ( दि.२४ )
बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आज दि.२४ वार मंगळवार रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सूर्या नेत्रालय येथील नेत्रतज्ज्ञ डॉ. अंजली गायकवाड यांच्या सहकार्याने हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.

या शिबिराचे उद्घाटन डॉ. गणेश ढवळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच बालासाहेब जाधव, पत्रकार हरिओम क्षीरसागर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शिबिरामध्ये मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी आपली नेत्र तपासणी करून घेतली. गरजू रुग्णांना अल्प दरात चष्म्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. तसेच डोळ्यांच्या विविध समस्यांचे निदान करून रुग्णांना योग्य उपचार व मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपाली चिटकुलवार, डॉ. ऋषिकेश आंधळे, डॉ. प्रमोद गोरे (सीएचओ, बोरखेड), आरोग्य निरीक्षक अशोक लोखंडे, आरोग्य सेवक वीर सापते, प्रयोगशाळा तज्ञ ऋषिकेश शेळके, औषध निर्माता जे. एस. कंचार, परिचारिका सोनाली शिंदे, व्ही. बी. भांडवलकर, एल. एच. कर्मचारी सुरेश अवसरे तसेच सेविका ज्योत्स्ना शिंदे यांनी विशेष सहकार्य केले.

या नेत्र तपासणी शिबिरामुळे ग्रामस्थांमध्ये डोळ्यांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली असून, भविष्यातही अशा आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी