शिवजयंतीनिमित दिव्यांग विद्यार्थ्याना मिष्ठान्न भोजन व ब्लॅकेटचे वाटप
शिवजयंतीनिमित दिव्यांग विद्यार्थ्याना मिष्ठान्न भोजन व ब्लॅकेटचे वाटप
गेवराईत अनावश्यक खर्चाला फाटा देत छावा सेनेचा स्तुत्य उपक्रम
सखाराम पोहिकर
बीड जिल्हाप्रतिनिधी
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील मतिमंद निवासी विद्यालयात छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने अनावश्यक खर्चाला फाटा देत दिव्यांगा विद्याथ्र्याना मिद्यार्ध्या ना मिष्टान्न भोजन तसेच ब्लॉकेटचे वाटप व मोफत आरोग्य तपासणी करून सामाजिक उपक्रमाने जयंती साजरी करण्यात आली . या स्तुल्य उपक्रमाबद्दल छावा क्रांतीवीर सेतेचे उपस्थित मान्यवरांसह आदीकडून कौतूक केले जात आहे .
तर प्रत्येक महापुरूषांची जयंती अशा पद्धतीने सामाजिक उपक्रमाने साजरी केली पाहिजे असे आवाहनही यावेळी करण्यात आले .
यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . यावेळी व्यासपीठावर गेवराई पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किशोर पवार . गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप . छावाचे प्रदेश सरचिटणीस अनिल राउत . सपोनि संतोष जंजाळ . पोउनि बोडखे . छावा सेनेचे . भगवान सोरमारे . ज्ञानेश्वर तांगडे . किराणा असोसिएशनचे बाळूशेट बरगे . ग्रामसेवक अनिल आटोळे . पत्रकार विनायक उबाळे . डॉ . लेंडगुळे . शिवाजी ढोबळे . यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक छावा क्रांतीवीर सेनेचे जिल्हाप्रमुख राहुल चाळक . तर सुत्रसंचालन पत्रकार विनोद पौळ . यांनी केले . यावेळी तलाठी किरण दांडगे . तलाठी ढाकणे .मुक्ताराम मोटे . आप्पा मोटे . आदित्य मोटे . आप्पासाहेब मोटे . अशोक मोटे . ओमकार काळे . कैलास मार्गे . राम मोटे . गौरव चौधरी . विकास धस . अभिषेक चाळक . दिपक मोटे . बंटी यादव . अविनाश थोरात . आकाश शिंदे . सह आदी शिवप्रेमी नागरिक तसेच शाळेतील शिक्षक . शिक्षकेतर . कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
Comments
Post a Comment