आम आदमी पार्टी बीड कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
बीड (प्रतिनिधी) – आम आदमी पार्टी बीड कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी सैनिक अशोक येडे यांनी भूषविले.
या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून सामाजिक कार्यकर्त्या सुरेखाताई जाधव उपस्थित होत्या. तसेच बीड शहराध्यक्ष सय्यद सादेक, बीड शहर सचिव मिलिंद पाळणे, आजिनाथ जी रसाळ, राजश्री येडे, संजय गायकवाड, अभिषेक टाळके, स्वप्निल गायकवाड इत्यादी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी शिवरायांच्या शौर्य, पराक्रम आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.
यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी होते.
Comments
Post a Comment