अरोपींना अटक करुन पारधी समाजाचे पुनर्वसन करा अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तिव्र अंदोलन करु.

अनुसूचित जमातीच्या लोकांच्या घरांची तोडफोड करून जिवे मारण्याच्या उद्देशाने शस्त्र हल्ला करणाऱ्या गावगुंडांना तात्काळ अटक करा.

अरोपींना अटक करुन पारधी समाजाचे पुनर्वसन करा अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तिव्र अंदोलन करु.
गेवराई (प्रतिनिधी) दि. १७ तालुक्यातील सुर्डी येथे उदरनिर्वाहासाठी गायराण जमीनीवर झोपड्या उभारून वास्तव्य करणाऱ्या अनुसुचित जमातीतील पारधी समाजाच्या मुलांना तुम्ही या शाळेत यायचे नाही म्हणत शाळेतील लहान मुला-मुलींना बाहेर काढून मारहाण करत हाकलून दिले, नंतर पारधी वस्तीवर ३० ते ४० गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या जमावाने जिवे मारण्याच्या उद्देशाने तलवार, कुऱ्हाड, कोयते, लाठ्यासह हल्ला चढवला यात महिलांचा विनयभंगदेखील करण्यात आला, लहान मुलांसह महिला पुरुष गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालय बीड येथे उपचार सुरु असून जखमींच्या जवाबावरुन तसेच घटनास्थळी पंचनामा करत पारधी वस्तीवरील लोकांच्या व स्थानिकांच्या जवाबानुसार तलवाडा पोलिस ठाण्यात प्रथम तक्रार (FIR) नोंद करण्यात आली आहे. यात पोलिसांनी काही आरोपींवर अनुसुचित जाती/जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून अरोपी अद्याप फरार आहेत.
 सुर्डी येथील पारधी वस्तीवरील लोकांची घरे व झोपड्यांची फोडतोड करुन पुर्नत: उद्धवस्त केल्या आहेत त्यामुळे निवऱ्याची गैरसोय झाली आहे त्या पारधी समाजाचे तात्काळ पुनर्वसन करुण्यात यावे तसेच आरोपींना व या घटणेपाठीमागचा मास्टरमाईंड याचा शोध घेण्यात यावा त्याचबरोबर पारधी समाजाला शस्त्रधारी पोलिस संरक्ष देण्यात यावे अन्यथा वंचित बहुजन आघाडी तिव्र स्वरूपाचे अंदोलन करु असा ईशारा वंचीत बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ पोकळे, तालुका अध्यक्ष पप्पु गायकवाड, तालुका महासचिव किशोर भोले, तालुका उअध्यक्ष किशोर चव्हाण, तालुका प्रसिद्धीप्रमुख ज्ञानेश्वर हवाले, युवा कार्यकर्ते तीर्थराज सोनवणे यांच्या स्वाक्षरीने तहसिलदार गेवराई आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गेवराई यांना लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी