युवा सेना संकल्प दौरा बाजीराव चव्हाण यांनी परळीत गाजवून दाखवला
यूवा सेनेचा विजय दौऱ्याचा झंजावत.!
परळीत युवा सेना संकल्प दौरा शेकडो युवा सैनिकांच्या उपस्थिती संपन्न.
युवा सेना संकल्प दौरा बाजीराव चव्हाण यांनी परळीत गाजवून दाखवला.
जनतेने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पाठीशी उभे राहून खऱ्या गद्दाराना जागा दाखवली : निलेश शिंदे
परळी प्रतिनिधी : शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा खरा वारसदार म्हणून एकनाथ शिंदेंच्या नावावर महाराष्ट्रातील जनतेने तसेच निष्ठावंत शिवसैनिकांनी शिक्कामोर्तब केला आहे. याचं पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब, खा. डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेचे कार्याध्यक्ष पुर्वेशजी सरनाईक यांच्या सूचनेवरून यूवासेनेचा विजय दौरा टप्पा दुसरा चे आयोजन करण्यात आले होते. या दौऱ्यामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून युवासेना मराठवाडा सचिव निलेश शिंदे, मराठवाडा निरीक्षक बाजीराव दादा चव्हाण, मराठवाडा युवती निरीक्षक आकांक्षा चौगुले,
यांची प्रमुख उपस्थिती होती. परळीतील पाचवे ज्योतिर्लिंग प्रभु वैद्यनाथाचे दर्शनाने व आरतीने
युवासेना मराठवाडा सचिव निलेश शिंदे, मराठवाडा निरीक्षक बाजीराव दादा चव्हाण, मराठवाडा युवती निरीक्षक आकांक्षा चौगुले, युवा सेनेचे अविनाश जाधव यांनी या युवासेना विजय दौऱ्याची प्रथम सुरुवात धूम धडाक्यात केली. परळीच्या शासकीय विश्राम गृह, ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करत मराठवाडा कार्यकारणी सदस्यांचे परळी युवासेनेच्या वतीने न भूतो न भविष्यत जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर बोलताना निलेश शिंदे हे बोलत होते कि शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रामाणिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या खऱ्या शिवसेनेला मतदानरुपी आशीर्वाद दिले. जनतेने वेळोवेळी उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदेंच्या पाठीशी उभे राहून जनतेने खऱ्या गद्दाराना जागा दाखवली असे प्रतिपादन निलेश शिंदे यांनी युवासेना विजय दौऱ्या निमीत्त परळी येथे आयोजित युवासेना पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत केले. पुढे वरिष्ठ असलेले युवासेना मराठवाडा सचिव निलेश शिंदे, मराठवाडा निरीक्षक बाजीराव दादा चव्हाण, मराठवाडा युवती निरीक्षक आकांक्षा चौगुले, युवा सेनेचे अविनाश जाधव यांनीही युवा सैनिकांना आपले मनोगत व्यक्त करत प्रत्येक युवा सैनिकांनी आपल्या भागातील युवासेना जनतेची कामे करून बळकट करण्याचे सांगितले. यावेळी या युवा सेना विजय दौऱ्यात उपस्थित युवासेना जिल्हा प्रमुख सुजित शिंदे, रविराज बडे, शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे, उपजिल्हा प्रमुख राजा भैय्या पांडे, शहर प्रमुख वैजनाथ माने, यांच्या प्रमुख उपस्थितीत युवासेना विजय दौरा (टप्पा दुसरा) पार पडला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवासेना उपजिल्हा प्रमुख संतोष चौधरी, तालुका प्रमुख बाबा सोनवणे, विधानसभा प्रमुख विष्णू सलगर, शहर समन्वयक सुदर्शन यादव, उपशहर प्रमुख गोविंद गरड, सागर बुंदेले, आदींनी परिश्रम घेतले, या कार्यक्रमाला दीपक शिंदे, मोहन राजमाने, अनिल शिंदे, संजय गावडे, उमेश सोळंके, रुपेश गायकवाड, सचिन सोनवणे, विश्वनाथ राठोड, अमोल गायकवाड, मुंजा गायकवाड, विष्णु ढेंबरे, सचिन जाधव, गणेश साबणे, सतीश शिंदे, नितीन पौळ, गणेश भालेराव, अरुण माने, नर्सिंग पौळ, विशाल शिंदे, अनिकेत माने आदि युवा सैनिक शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment