मंत्री दत्तात्रय भरणे आरोग्यदूत बाजीराव चव्हाण यांची ग्रेट भेट
महाराष्ट्रातील अनेक मंत्री आमदार बाजीराव चव्हाण यांच्या आरोग्य कार्याला प्रेरित होऊन भेटीस येत असल्याची चर्चा.
बीड प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय याचे मंत्री श्री. दत्तात्रय भरणे हे बीडला प्रजासत्ताक दिनानिमित्त आले होते. 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनी मंत्री दत्तात्रय भरणे हे बीड शहरांत होते. तेव्हा त्यांनी वेळात वेळ काढून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मानले जाणारे बीडचे भूमिपुत्र असलेले आरोग्य दूत बाजीराव चव्हाण यांची ग्रेट भेट घेतली. या भेटी मागे काय कारण होते हे कळू शकले नाही मात्र मंत्री दत्तात्रय भरणे हे अजित पवार गटाचे आमदार असून ते आज क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास व औकाफ महाराष्ट्राचे मंत्री आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड आणि पुण्याचे पालकमंत्री असल्याने, ते पुण्यामध्ये ध्वजारोहणासाठी हजर राहिले असल्याने. एकाच वेळी दोन ठिकाणी ते पोहोचू शकत नसल्या कारणाने त्यांनी त्यांच्याच पक्षाचे मंत्री असलेली दत्तात्रय भरणे यांना बीड येथे ध्वजारोहणास उपस्थित राहण्यास कळवले असावे. त्या कारणाने मंत्री दत्तात्रय भरणे हे 26 जानेवारी दिवशी बीडमध्ये उपस्थित होते. मात्र बीडसह महाराष्ट्र राज्याचे आरोग्य दूत मानले जाणारे बाजीराव चव्हाण यांचे महाराष्ट्रातील सर्वच मंत्री आणि आमदार यांच्याशी चांगले घनिष्ठ संबंध असल्याने महाराष्ट्रातील प्रत्येक मंत्री आणि आमदार बीड दौऱ्यावर आल्यास आरोग्य दूत बाजीराव चव्हाण यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयास येत जात असतात. अशाच काही कारणाने 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनी क्रीडा आणि अल्पसंख्याक मंत्री दत्तात्रेय भरणे हे बाजीराव चव्हाण यांच्या कार्यास सदिच्छा भेट देण्यास आले होते. यावेळी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा आरोग्य दूत बाजीराव चव्हाण यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर मोठ्या गाजावाजा पुष्पवृष्टी करून आपल्या कार्यालयात मोठा सन्मानपूर्वक सत्कार केला. त्यावेळी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी बाजीराव चव्हाण यांना मी आपल्या कार्यालयास भेट देण्यासाठी येणार हा शब्द दिला होता तो पूर्ण केला बाजीराव असे बोलून दाखवले. यावरून असे लक्षात येते की बीडचे आरोग्य दूत बाजीराव चव्हाण यांच्या आरोग्य कार्याला पाहता महाराष्ट्रातील सर्वच आमदार मंत्री हे बाजीराव चव्हाण यांच्या भेटीसाठी येतात असे बोलले जाते. या भेटेतून बाजीराव चव्हाण यांच्या हातून क्रीडा क्षेत्रातील व आपल्याकडे असलेल्या मंत्रिमंडळाच्या खात्यातील योजनेमधून बीडच्या युवकांसाठी क्रीडा क्षेत्रात युवकांना पुढे जाण्याकरता बाजीराव चव्हाण यांच्या हातात काही महत्वाच्या धुरा येऊ शकतात अशी ही चर्चा केली जात आहे. यावेळी उपस्थित धर्मवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, बाजीराव चव्हाण युवा मंच महाराष्ट्र राज्य, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष बीड, व शिवसेना चे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment