अठरा वर्षे पूर्ण झालेल्या सर्व मतदार बंधू आणि भगिनी यांनी आपली मतदार म्हणून नोंदणी करून घ्यावी-नवनाथ अण्णा शिराळे पाटील
बीड प्रतिनिधी
सध्या बीड जिल्ह्यामध्ये अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम समाजसेवेच्या कार्यामध्ये व देव देश आणि धर्म या ब्रीद वाक्याला अनुसरून सर्व नागरिकांच्या हिताच्या कार्यामध्ये सातत्याने अग्रेसर असलेले तथा भारतीय जनता पार्टीचे नेते तथा बीड जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ अण्णा शिराळे पाटील यांनी गावागावात जाऊन बीड जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे सदस्य नोंदणी अभियान त्यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील सर्वच गावा गावां मध्ये खेड्यापाड्यांमध्ये सुरू आहे याच पार्श्वभूमीवर अठरा वर्ष ज्या मतदार बंधू आणि भगिनींचे पूर्ण झाले असतील अशांनी तात्काळ आपापले मतदान नोंदणी करून आपापले ओळखपत्र निवडणूक आयोगाकडून मिळून घ्यावे या करता त्यांनी आपली नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे या नोंदणीसाठी लागणारे डॉक्युमेंट टीसी ची झेरॉक्स आधार कार्ड आणि एक फोटो असे डॉक्युमेंट घेऊन तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागामध्ये किंवा सेतू केंद्रावर जाऊन आपली आपली मतदान नोंदणी करून घ्यावी आणि निवडणूक आयोगाला सहकार्य करावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे नेते तथा नगर परिषदेचे उपसभापती तथा जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी बीड मा नवनाथ अण्णा शिराळे पाटील यांनी सर्व बीड जिल्ह्यातील तमाम मतदार बंधू आणि भगिनी यांना केले आहे या आव्हानामुळे नवनाथ अण्णा शिराळे पाटील यांचे सर्व स्तरातून सर्वांना मतदान नोंदणीची माहिती दिल्याबद्दल व तसेच देव देश धर्म या ब्रीद वाक्याला अनुसरून सर्व नागरिकांना सर्व काळी मग कधीही असो रात्र असो किंवा दिवस असो या सर्व काळामध्ये सर्वांच्या मदतीला धावणारे असे लोकनेते मा नवनाथ अण्णा शिरोळे पाटील यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे .
Comments
Post a Comment