आमदार सुरेश आण्णा धस यांच्या वाढदिवसा निमित्त युवानेते राज खवळे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
पाटोदा (गणेश शेवाळे) आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे भाग्यविधाते आमदार सुरेश आण्णा धस यांच्या वाढदिवसा निमित्त घुमरा पारगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना युवानेते राज खवळे यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप करण्याचे आयोजन करण्यात आले आहे. आपले नेते आमदार सुरेश आण्णा धस यांच्या वाढदिवसा निमित्त बॅनरबाजी व इतर व्यर्थ खर्च न करता शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याचे आयोजन युवानेते राज खवळे यांनी घेतल्याने राज खवळे यांच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक करण्या सारखे आहे शालेय साहित्य वाटप सामाजिक उपक्रमास आपण ही येऊन साक्षीदार बना आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना जिद्द, मेहनत आणि सामर्थ्याला वाव देण्यासाठी सुरेश आण्णा धस मित्र मंडळाच्या नेते कार्यकर्ते पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे आशे आवाहान युवानेते राज खवळे यांनी केले आहे
Comments
Post a Comment