पत्रकार संघ आणि आश्रय सेवा केंद्राच्या वतीने देण्यात येणारा जागतिक स्त्रीरत्न पुरस्कार समाजसेविका अनिता वाघमारे यांना जाहीर

बीड प्रतिनिधी 
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पत्रकार संघ आणि आश्रय सेवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने जगा वेगळं आव्हान स्वीकारणाऱ्या मुली आणि महिलांना जागतिक स्त्रीरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सामान्य कुटुंबातील अनिता वाघमारे यांनी येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करत आपले वेगळे विश्व उभारले आहे. त्यांनी वृद्ध, निराधार यांच्या सेवेतून थेट राजकारणात उंच भरारी घेतली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन निवड जाहीर करण्यात आली आहे. या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
देश सेवेत आपले उभे आयुष्य वेचलेल्या आर्मी मधील दामोदर गायकवाड यांची कन्या अनिता वाघमारे यांनी आपल्या उभ्या आयुष्यात अनंत कष्ट, यातना सोसल्या. भाजी विक्री पासून ते बीड शहरातील सफाई कामगारापर्यंत त्यांनी काम केले. कामामध्ये कधीही कुचराई केली नाही. कोणत्याही कामाची लज्जा कधी बाळगली नाही. ज्येष्ठ राजकारणी शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचारांवर प्रेरित होऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. मध्यंतरी पक्षांमध्ये फाटाफुटी झाली. फुटीरांनी अनेक आमिषे दाखवली. मात्र त्यांनी पक्षासोबत आणि निष्ठे सोबत व्यक्तिगत स्वार्थापोटी कधी गद्दारी केली नाही.येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये उभे राहून यशस्वी होण्यासाठीच प्रामाणिक लढा उभा करायचा असा निर्धार अन निश्चय त्यांनी केला आहे. त्यांच्या या जीवन कार्याची दखल घेऊन, त्यांनी स्वीकारलेले आव्हानात्मक वेगळेपण लक्षात घेऊन पत्रकार संघ आणि आश्रय सेवा केंद्राच्या वतीने येणाऱ्या 8 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मान्यवरांच्या उपस्थितीत जागतिक स्त्रीरत्न पुरस्कार हा सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन प्रदान करण्यात येणार आहे. असे आश्रय सेवा केंद्राच्या अध्यक्षा शेख आयेशा यांनी जाहीर केले आहे. अनिता वाघमारे यांना जागतिक स्त्रीरत्न पुरस्कार जाहीर झाल्याने सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


जगावेगळे वेगळेपण जपणाऱ्या महिलांनी पुरस्कारासाठी संपर्क करावा - शेख आयेशा 

ज्या महिलांनी शून्यातून विश्व निर्माण करत आपले अस्तित्व उभा केले आहे. अशा यशस्वी महिलांना जागतिक स्त्रीरत्न पुरस्काराने मान्यवरांच्या शुभहस्ते जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 8 मार्च 2025 रोजी सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारास पात्र असणाऱ्या मुलींनी, महिलांनी आपल्या कार्य अहवालासह तात्काळ 70 30 14 93 22 यानंबर वर संपर्क साधावा असे आवाहन आश्रय सेवा केंद्राच्या अध्यक्षा शेख आयेशा यांनी केले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी