बीड शहरातील भाजपाचे ज्येष्ठ नेते नवनाथ अण्णा शिराळे पाटील यांच्या घरी सुहासनी महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला संपन्न

 ..


बीड प्रतिनिधी .

बीड शहरातील ज्येष्ठ नेते तथा भारतीय जनता पार्टीचे बीड जिल्हा उपाध्यक्ष तथा देव देश आणि धर्म या कार्यासाठी अहोरात्र परिश्रम करून सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे व प्रत्येक धर्म कार्यामध्ये अतिशय मोलाचा वाटा उचलणारे मग अखंड हरिनाम सप्ताह असो किंवा श्रीमद् भागवत कथा असो किंवा श्री गुरुचरित्र पारायण सोहळा असो या सर्व धार्मिक कार्यामध्ये ते सातत्याने धार्मिक सेवा करून प्रत्येक ठिकाणी ते आर्थिक मोठी धर्मासाठी मदत ही करतात एक ठिकाणी श्री संत तुकाराम महाराज देखील सांगतात की सत्य कर्मा व्हावे सहाय्य घातलीय भय नरका जाणे या संत वचनाप्रमाणे या प्रमाणे म्हणून या वर्षी देखील मकर संक्रांतीच्या पर्व काळावर त्यांनी त्यांच्या निवासस्थानी म्हणजेच 
 ओम नमो सदन या निवासस्थानी बीड शहरातील सर्व सुवासनी महिलांसाठी हळदी कुंकवाचा महोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला गेली 25 वर्षापासून ही परंपरा हळदी कुंकवाची नवनाथ अण्णा शिरोळे पाटील यांच्या निवासस्थानी हळदी कुंकवाचा हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अत्यंत मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणाच्या जल्लोषात हा महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी महिलांचे औक्षण सौं रुक्मिणी बाई नवनाथ शिराळे व मालन गोरख शिराळे सोनम गोविंद शिराळे श्रावणी कृष्ण शिराळे ऋतुजा गणेश शिराळे या महिला भगिनींनी सर्व महिलांना हळदी कुंकवाच्या निमित्ताने एक वाण ववसा म्हणून एक श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा श्री हरिपाठ पवित्र ग्रंथ येथे उपस्थित असलेल्या सर्व महिलांना वान ववसा म्हणून वाटप करण्यात आले याच बरोबर महिलांना चहापाण्याऐवजी उसाचा थंडगार उत्कृष्ट आणि चवदार चांगल्या उसाचा रस महिलांना व लाहन बाळांना रसाचे वाटप या वेळी करण्यात आलं हजारो महिलांची या वेळी या महोत्सवामध्ये आपली आपली हजेरी लावून हा आनंद उत्सव साजरा करण्यात आला या वेळी जिजाऊ नगर धांडे नगर लक्ष्मण नगर गणेश नगर फुलेनगर माळे गल्ली शिराळे गल्ली धांडे गल्ली पिंगळे गल्ली शिवाजीनगर परिसरातील शिवराज नगर परिसरातील शिराळे नगर येथील सर्व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या उत्कृष्ट कार्यक्रमाचे आणि निवेदन करणाऱ्या नवनाथ अण्णा शिराळे पाटील यांच्या परिवाराचे सर्व बीड शहरातील महिला भगिनींमधून कौतुक होत आहे असेच जर वाल पावसा हा धर्मग्रंथ देऊन मग श्रीमत भगवद्गीता असो किंवा ज्ञानेश्वरी असो किंवा हरिपाठ असो असे वेगळे वेगळे धर्मग्रंथ प्रत्येक वर्षी संक्रांतीच्या पर्व काळामध्ये सर्वत्र प्रत्येकाने आपापल्या घरी अण्णा शिराळे पाटील परिवाराचा म्हणजेच अण्णा प्रत्येक वेळी आपल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये सांगत असतात की देव देश आणि धर्म या साठी प्रत्येकाने आपापले कर्तव्य म्हणून धर्मासाठी देशासाठी आणि देवासाठी कार्य केले पाहिजे हाच शिराळे पाटील परिवाराचा आदर्श बीड शहरातील इतरांनी घेऊन असा कार्यक्रम हळदी कुंकवाचा जर राबवला तर नक्कीच धार्मिक कार्यामध्ये वृद्धी होऊन प्रत्येक जण आपापल्या परीने परमार्थ केल्याशिवाय आणि दिलेल्या धर्मग्रंथाचे अध्ययन केल्याशिवाय राहणार नाही असेही बोलले जात आहे ..

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी