पत्रकार संघ आणि आश्रय सेवा केंद्राच्या वतीने देण्यात येणारा जागतिक स्त्रीरत्न पुरस्कार समाजसेविका, लेखिका रूपाली देशपांडे यांना जाहीर

 

बीड प्रतिनिधी 
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पत्रकार संघ आणि आश्रय सेवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने जगा वेगळं आव्हान स्वीकारणाऱ्या मुली आणि महिलांना जागतिक स्त्रीरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या, कायम वेगळेपण जपणाऱ्या, बीड जिल्ह्यातील पहिल्या महिला इव्हेंट मॅनेजर रूपाली जयंत देशपांडे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
मूळ बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या रूपाली जयंत देशपांडे यांनी मृत्यूवर मात करत नव्याने आपले आयुष्य नेत्रदीपक करण्याचा प्रयत्न आपल्या अथक परिश्रमातून केला आहे. बीड जिल्ह्यातील भावी पिढी सुसंस्कारी घडावी यासाठी रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतन सारखे एक आदर्शवत गुरुकुल बीडमध्ये निर्माण करण्याची मानसा रूपाली देशपांडे यांनी स्वप्नी बाळगली आहे. धोंडीपुरात वीस वर्षापूर्वी पहिले जनरल दुकान दुकान सुरू करणाऱ्या त्या पहिल्या एकमेव महिला होत्या. या व्यवसायानंतर लग्न मंडपाचा व्यवसाय सुरू करणाऱ्या त्या पहिल्या महिला बीडच्या ठरल्या. एवढेच नव्हे तर पुढे त्यांनी इव्हेंट मॅनेजर म्हणून काम सुरू केले. हे काम देखील पहिल्या महिला म्हणून त्यांनीच स्वीकारलेले होते. त्यांच्या या जीवन कार्याची दखल घेऊन, त्यांनी स्वीकारलेले आव्हानात्मक वेगळेपण लक्षात घेऊन पत्रकार संघ आणि आश्रय सेवा केंद्राच्या वतीने येणाऱ्या 8 मार्च 2025 जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानाचा देण्यात येणारा जागतिक स्त्रिरत्न पुरस्कार हा सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन प्रदान करण्यात येणार आहे. असे आश्रय सेवा केंद्राच्या अध्यक्षा शेख आयेशा यांनी जाहीर केले आहे. रूपाली देशपांडे यांना जागतिक स्त्रीरत्न पुरस्कार जाहीर झाल्याने सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

जगावेगळे वेगळेपण जपणाऱ्या महिलांनी पुरस्कारासाठी संपर्क करावा - शेख आयेशा 
ज्या महिलांनी शून्यातून विश्व निर्माण करत आपले अस्तित्व उभा केले आहे. अशा यशस्वी महिलांना जागतिक स्त्रीरत्न पुरस्काराने मान्यवरांच्या शुभहस्ते जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 8 मार्च 2025 रोजी सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारास पात्र ठरणाऱ्या मुलींनी, महिलांनी आपल्या कार्य अहवालासह तात्काळ 70 30 14 93 22 यावर नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन आश्रय सेवा केंद्राच्या अध्यक्षा शेख आयेशा यांनी केले आहे

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी