26 जानेवारी दिवशी दंतरोग शिबिरात बीडमधील शेकडो गरजू रुग्णांचा केला मोफत उपचार.

आरोग्यदूत बाजीराव चव्हाण यांचा आरोग्य बाणा.

26 जानेवारी दिवशी दंतरोग शिबिरात बीडमधील शेकडो गरजू रुग्णांचा केला मोफत उपचार.


प्रजासत्ताक दिनानिमित्त बीडमध्ये बाजीराव चव्हाण युवा मंचचे भव्य मोफत दंतरोग चिकित्सा शिबीर संपन्न


बाजीराव चव्हाण युवा मंच अध्यक्ष रोहीत धुरंधरे यांनी 26 जानेवारी निमित्त मोफत दंत तपासणी राबवून बीड मधील शेकडो गरजू रुग्णांना मोफत सेवा दिली.

बीड प्रतिनिधी :देशाचा नागरिक म्हणून आपल्या देशाची सेवा कुठल्या ना कुठल्या माध्यमातून करण्याचा प्रत्येकाचा एक ध्यास असतो. असाच एक ध्यास बाजीराव चव्हाण युवा मंचचे अध्यक्ष रोहित धुरंधरे यांनी आरोग्य दूत बाजीराव दादा चव्हाण यांच्या पाशी मांडला. की भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी आपल्या बीड शहरातील नागरिकांच्या सेवेसाठी एक भव्य दिव्य असे दंतरोग निदान शिबिर बीड मध्ये राबवले पाहिजे. रुग्णांच्या सेवेसाठी नामांकित डॉक्टर्स यांच्या टीमच्या माध्यमातून 26 जानेवारी रोजी एकदा आपण एक मोफत शिबीर राबवू. तेव्हा आरोग्य दूत बाजीराव चव्हाण यांनी क्षणाचाही विलंब न करता एका दिवसात रुग्ण सेवा ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य समोर ठेवता. 26 जानेवारीला बीड मधील लोकसेवा दंतचिकित्सालय, नगर नाका बीड, येथे हे दंतरोगनिदान शिबिर सामान्य गरजूंच्या हितासाठी राबवण्यास परवानगी दिली. तेव्हा लगेचच आरोग्य दूत बाजीराव (दादा) चव्हाण युवा मंचचे अध्यक्ष रोहीत धुरंधरे हे लोकसेवा डेंटल क्लिनिकचे चे डॉक्टर किरण वनवे सर यांना भेटून एका दिवसात या भव्य दिव्य मोफत दंत रोगनिदान शिबिराचे आयोजन केले. या मोफत शिबिरामध्ये बीड सह गेवराई आणि बीड मधील ग्रामीण भागातील शेकडो गरजू गरीब रुग्णांनी या मोफत शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. डॉ किरण वनवे सर, डॉ, भक्ती वनवे, नंदू बागलाने, व त्यांच्या सर्व टीमने या शिबिरामध्ये रुग्णांची दात काढणे, रूट कॅनल, इम्पलंत ट्रीटमेंट, स्माईल डिझायनिंग, दाताला पिना बसवणे, इत्यादी अनेक दंत रोगावरील रुग्णांना मोफत सेवा देण्यामध्ये आपली महत्त्वपूर्ण योगदान दिले. हे मोफत शिबीर सर्व सामान्यासाठी राबवून आरोग्यदूत दूत बाजीराव चव्हाण यांनी आपल्या भारत देशाचा मान आणि सेवा करण्याचा ध्यास हा पुन्हा एकदा आजच्या 26 जानेवारी निमित्त मोफत दंत रोग निदान शिबिराच्या माध्यमातून शेकडो गरजू रुग्णांची मोफत सेवा करून दाखवून दिला आहे. आजच्या झालेल्या मोफत शिबिरातून बीड मधील शेकडो गरजू रुग्णांची झालेली सेवा ही बाजीराव चव्हाण यांना आशीर्वाद देणारी मानली जात आहे. या शिबिराचे आयोजक बाजीराव (दादा) चव्हाण युवा मंचचे अध्यक्ष रोहीत धुरंधरे, यांनी केले. यावेळी सहकारी मित्र शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख महादेव मातकर, मनसे शहर प्रमुख अमर जान पठाण साहेब, वैद्यकीय उपजिल्हा प्रमुख शरद झोडगे, सिताराम ढोले फाउंडेशनचे अशोक ढोले पाटील, युवक क्रांतीचे संपादक लक्ष्मण गायकवाड, पत्रकार विलास शिंदे, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पालीमकर, पत्रकार इम्रान सौदागर, रुग्णसेवक नारायण पवार, रुग्णसेवक विलास सातपुते, तावरे प्रकाश, दत्तात्रय सौंदरमल, महेश जाधव, अजय जाधव, संदीप गांडगे, ऋषिकेश करंडे, समाधान ठोकळ, महेश काळे, जालिंदर शिंदे, आदी शेकडो कार्यकर्ते मित्र मंडळी उपस्थित होते.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी