शिवसंग्राम च्या वतीने नवरात्र काळात "जागर मातृ शक्तीचा" अभियान

शिवसंग्राम च्या वतीने नवरात्र काळात "जागर मातृ शक्तीचा" अभियान

अभियानांतर्गत डॉ.ज्योती मेटे यांच्या वतीने लोकप्रिय "होम मिनिस्टर" या भव्य कार्यक्रमाचे आयोजन

सिनेअभिनेता क्रांती नाना माळेगावकर आणि टीव्ही स्टार सह्याद्री माळेगावकर यांची असणार उपस्थिती
बीड (प्रतिनिधी) शिवसंग्रामच्या वतीने दी.२ ऑक्टोबर रोजी सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवात "जागर मातृ शक्तीचा" हे अभियान राबवण्यात येणार आहे. यानिमित्त नवरात्र काळात संबंध महाराष्ट्रत महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय असणारा "होम मिनिस्टर" (खेळ रंगला पैठणीचा) सिने अभिनेता क्रांती नाना माळेगावकर आणि टीव्ही स्टार सह्याद्री माळेगावकर यांचा भव्य कार्यक्रम दि. ०७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वा. आशीर्वाद मंगल कार्यालय, बार्शी रोड, बीड येथे शिवसंग्राम अध्यक्ष डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांनी आयोजन केले आहे.
लवकरच आदिशक्तीच्या नवरात्र उत्सवास प्रारंभ होणार आहे. या नवरात्रीमध्ये "मातृ शक्तीचा जागर" आपण नऊ दिवस आदीमायेच्या नऊ रूपांना पूजन करणार आहोत. आदिशक्तीचे स्वरूप असलेल्या महिला घर सांभाळतात, घरातल्यांनाही सांभाळतात घरखर्चही भागवतात आणि घराला सावरायचंही काम करतात. पण एवढं सारं करून सवरून विश्रांती, विरंगुळ्यापासून त्या वंचित राहतात. त्यांना ही कामातून थोडीशी विश्रांती मिळाली पाहिजे, त्यांच्या जिवाला थोडा विरंगुळा पाहिजेच यासाठीच या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात पारंपरिक खेळांबरोबर यंदा महिलांना "होम मिनिस्टर" सारखे आधुनिक खेळही खेळायला मिळणार आहेत. जोडीला आणखीही बरेच स्पर्धात्मक उपक्रम आहेत. यात भाग घेणाऱ्या महिलांसाठी मोठ-मोठी बक्षिसं मिळणार आहेत. या कार्यक्रमासाठी वयाची अट नाही. यंदाचा नवरात्र उत्सव सहभागी महिलांना आयुष्यभर लक्षात राहावा अशा पद्धतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी