विकासकामांच्या नावाखाली तोडलेली झाडे लावणार कधी ? वनविभागाच्या ढिसाळ कारभारामुळे बीड जिल्ह्याचे वाळवंट

विकासकामांच्या नावाखाली तोडलेली झाडे लावणार कधी ? वनविभागाच्या ढिसाळ कारभारामुळे बीड जिल्ह्याचे वाळवंट :- डॉ.गणेश ढवळे 
बीड:- ( दि.२२ ) मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात २.४ ईतके कमी वनक्षेत्र असुन निसर्गाचा समतोल राखण्यासाठी ३३ टक्के वनक्षेत्र अपेक्षित असताना वनक्षेत्र कमी असल्याने वारंवार दुष्काळाचे संकट ओढावत आहे.हरितक्षेत्र वाढवण्यासाठी शासनाकडून " झाडे लावा झाडे जगवा" जाहिरात बाजी करत कोट्यवधींचा खर्च करण्यात येतो.मात्र वृक्षलागवड कागदोपत्रीच दिसून येते.त्यात भरीस भर म्हणून विकासकामांच्या नावाखाली रस्ता रुंदीकरण अथवा रेल्वे लाईन ब्राड रोडवेज कामासाठी ५० वर्षापुर्वीचे महाकाय चिंच ,लिंब ,वड,पिंपळ,नांदुरकी आदि वृक्षांची कत्तल करण्यात ये मात्र पर्यावरणाचे रक्षण व्हावे यासाठी पाचपट झाडे लावणे बंधनकारक असताना काम पूर्ण होऊन ५ वर्षें उलटुनही संबंधित कंत्राटदार कंपनीकडून वृक्षलागवड करण्यात येत नाही.सामाजिक कार्यकर्ते यांच्या लेखी तक्रारी, आंदोलनानंतर सुद्धा जिल्हा प्रशासन आणि विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे आणि" अर्थपूर्ण" दुर्लक्षामुळे बीड जिल्ह्याचे वाळवंट झाले असल्याची खंत सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे आणि रामनाथ खोड यांनी बोलुन दाखवली. अहमदनगर - बीड - परळी नविन ब्रॉड गेज लाईन प्रकल्पासह राष्ट्रीय महामार्ग २११ धुळे ते सोलापूर हायवेवरील जवळपास ५० महाकाय वृक्ष वनविभागाच्या परवानगीने तोडण्यात आली आहेत.मात्र याचवेळी वृक्ष लागवडी बाबत जिल्हा प्रशासन आणि वनविभाग मुग गिळून गप्पच आहे.

एकीकडे पर्यावरण संरक्षणाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मुख्यमंत्र्यांना मिळाला मात्र बीड जिल्ह्याचे वाळवंट झाले तरी जिल्हा प्रशासन व वनविभागाला सोयरंसुतक नाही :- डॉ.गणेश ढवळे 

जागतिक तापमान वाढीचे युग संपुन होरपळीचे युग सुरू झाले असुन ठोस निर्णय घेण्याचे आवाहन संयुक्त राष्ट्र संघटनेने केले असुन महाराष्ट्र शासनाने भविष्यातील धोका ओळखून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पर्यावरण विषयक महत्वाचे निर्णय घेऊन अंमलबजावणी साठी एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरण व शाश्वत विकास कृती समितीची स्थापना करण्यात आली असुन पर्यावरण व शाश्वत विकासासाठी करत असलेल्या कार्याची दखल थेट आंतरराष्ट्रीय पातळीवरून घेऊन दुसरा जागतिक कृषी पुरस्कार एकनाथ शिंदे यांना १८ सप्टेंबर रोजी प्रदान करण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे बीड जिल्हा प्रशासन आणि वनविभाग यांना याचे काहीही सोयरेसुतक नसल्याचे दिसून येत असल्याची खंत डॉ.गणेश ढवळे यांनी बोलून दाखवली.

राष्ट्रीय महामार्गावरील वृक्षतोडीच्या पुन:र्वसनाचे काय झालं? :- रामनाथ खोड 

बीड जिल्ह्यातील धुळे ते सोलापूर, बीड ते अहमदनगर, अहमदपूर ते अहमदनगर आणि बीड ते परळी राष्ट्रीय महामार्गावरील महाकाय वृक्षांची रस्ते रूदीकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर कत्तल करण्यात आली मात्र त्या मोबदल्यात शासकीय नियमानुसार ५ पट वृक्षलागवड आणि वृक्षांच्या पुनःवसनाचे रस्ते काम पूर्ण होऊन ५ वर्षं उलटूनही अद्याप वृक्षलागवड करण्यात आली नाही त्याचं काय झालं असा संतप्त सवाल पर्यावरण प्रेमी रामनाथ खोड यांनी केला असुन वनविभागातील अधिकारी आणि रस्ते कामातील कंत्राटदार यांची मिलीभगत असल्याने परिस्थिती गंभीर झाली असल्याचे म्हटले आहे.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी