मराठा समाजाच्या आरक्षणाला धनगर समाजाचा जाहीर पाठिंबा : मोहन नाना देवकते
मराठा समाजाच्या आरक्षणाला धनगर समाजाचा जाहीर पाठिंबा : मोहन नाना देवकते,
मराठा आणि धनगर समाजामध्ये वाद नाही,
बीड प्रतिनिधी ,अंकुश गवळी
अंतरवाली सराटी या ठिकाणी चालू असलेले उपोषण आणि त्यामध्ये चालू असलेले वाद यामध्ये आमचा धनगर समाज कदापी पडणार नाही.
मूळतः आमची धनगर समाजाची जी मागणी आहे ती S ते (अनुसूचित जाती) मध्ये असलेल्या आरक्षणाची आहे.
त्यामुळे मराठा समाज नेहमी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने आहे त्याच प्रकारे धनगर समाज सुद्धा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करत नाही. त्यामुळे मराठा समाजाची वेगळी मागणी आहे, आणि आमची धनगर समाजाची वेगळी मागणी एसटी आरक्षण संदर्भात, त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाला धनगर समाजाचा फुल पाठिंबा आहे, असं प्रसिद्धी पत्रकाद्वारे आनंदवाडी चे विद्यमान सरपंच मोहन नाना देवकते यांनी सांगितले आहे,
Comments
Post a Comment