लोकशाही पत्रकार संघाच्या निवडी जाहीर
महाराष्ट्र राज्य महिला व बाल कल्याण विकास समितीच्या प्रदेश अध्यक्षपदी सारिका यादव, उद्योग विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी अमोल घोडके , तर कायदेशीर विधी सल्लागार समिती मराठवाडा अध्यक्षपदी
अँड श्रीकांत जाधव यांची नियुक्ती
बीड दि.२१(प्रतिनिधी) : पत्रकारांचा बुलंद आवाज म्हणून ओळख असणाऱ्या लोकशाही पत्रकार संघाच्या महाराष्ट्र राज्य महिला व बाल कल्याण विकास समितीच्या प्रदेश अध्यक्षपदी सारिका यादव, प्रदेश उपाध्यक्ष प्रयोगशाळा तंत्रज्ञ् तथा सामाजिक कार्य विकास समिती डॉ. सुरेश पिंपळे, मराठवाडा अध्यक्ष इलेक्ट्रॉनिक मीडिया विकास समिती पदी नितेश उपाध्ये यांची निवड संघाचे संस्थापक अध्यक्ष बी.बी वैद्य, राष्ट्रीय उपाध्यक्ष संदीप जाधव, प्रदेश उपाध्यक्ष साजेद सय्यद, मराठवाड्याचे प्रदेश उपाध्यक्ष दत्तात्रय नरनाळे यांनी केली. त्यानंतर लोकशाही पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष भागवत वैद्य , प्रदेश उपाध्यक्ष पोलीस मित्र विकास समिती राणी शेख, बीड जिल्ह्याचे अध्यक्ष आत्माराम वाव्हळ, पाश्चिम बीड जिल्हा अध्यक्ष बिलाल शेख, महिला बचत गटाच्या बीड जिल्हा अध्यक्षा सौ. संजीवनी खोगरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
राज्यभरात लोकशाही पत्रकार संघामुळे पत्रकारांचे मजबूत संघटन उभारले जात आहे. पत्रकारांना विमा कवच, त्यांच्या पाल्यांचे शिक्षण, घर, नवे तंत्रज्ञान कौशल्य, सेवानिवृत्ती नंतरच्या आयुष्याचे नियोजन या प्रश्नांकडे लोकशाही पत्रकार संघाने लक्ष केंद्रित केले असल्याने राज्यभरातील
पत्रकारांचा देखील मोठा प्रतिसाद लोकशाही पत्रकार संघाला मिळत आहे.
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असूनही तो अनेक मुलभूत सुविधांपासून वंचित आहे, त्याच्या संरक्षणाचा प्रश्न मागे पडला आहे, तो लोकशाहीचा महत्वाचा घटक असूनही निराधार असल्याचे दिसते आहे. लोकशाहीचे जतन करणे आता लोकशाही पत्रकार संघाचे काम आहे असे मत डॉ. सुरेश पिंपळे यांनी व्यक्त केले.
यासोबतच इलेक्ट्रिनिक (डिजिटल )मीडिया’ला पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहात घेतले जात नाही. ‘डिजिटल मीडिया’चे काम करणाऱ्या पत्रकारांना त्यांचे अधिकार मिळत नाहीत. ‘डिजिटल मीडियातील सर्व पत्रकारांना मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांचे अधिकार मिळवून देणे यासाठी भविष्यात आमची लढाई असेल असे मत पत्रकार नितेश उपाध्ये यांनी मांडले त्याच बरोबर महिला व बाल कल्याण समितीचे माध्यमातून त्यांचा विकास करणे गरजेचे आहे असे मत सारिका यादव यांनी म्हटले आहे. ऑनलाईन क्षेत्रात काम करत असलेल्या पत्रकारांच्या पाठीशी ठाम पणे उभे राहून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी भविष्यात काम करणार असल्याचं सांगत, मराठवाड्यात उद्योग क्षेत्रात पत्रकारांनी पुढाकार घेऊन आर्थिक बाजू मजबूत केली पाहिजे. यासाठी मी सर्वतोपारी सहकारी करिन असे आश्वासन नवनिर्वाचित सं. अ. भागवत वैद्य यांनी सांगितले. यावेळी प्रदेश,मराठवाडा पातळीवरील महत्त्वाच्या पदावर निवड करत काम करण्याची संधी दिली म्हणून लोकशाही पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष भागवत वैद्य आणि लोकशाही पत्रकार संघाच्या सर्व टीमचे त्यांनी आभार मानले. एकंदरीत या निवडीनंतर महाराष्ट्र राज्य महिला व बाल कल्याण विकास समितीच्या प्रदेश अध्यक्षपदी सारिका यादव, प्रदेश उपाध्यक्ष प्रयोगशाळा तंत्रज्ञ् तथा सामाजिक कार्य विकास समिती डॉ. सुरेश पिंपळे, मराठवाडा अध्यक्ष इलेक्ट्रॉनिक मीडिया विकास समिती पदी नितेश उपाध्ये यांची निवड झाल्याबद्दल या तिन्ही पदाधिका-यांवर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या वेळी ॲड. जहीर पठाण बीड जिल्हा वकील संघाचे सहसचिव ॲड. श्रीकांत जाधव सचिव ॲड. यासेर पटेल ॲड. सय्यद साजिद ॲड. फिरोज उपाध्यक्ष ॲड. अविनाश गडगे, अँड सिद्धार्थ उजगरे आदी उपस्थित होते. या वेळी उपस्थित सर्वांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment