जयदीप कवाडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा - अनिल तुरुकमारे




 बीड प्रतिनिधी - बीड जिल्ह्यातील विविध मागणी संदर्भात 30 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर लोकशाही मार्गाने आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे यामध्ये हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे , राष्ट्रीय कार्याध्यक्ष पी.आर.पी चे जयदीप भाई कवाडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघणार आहे.अशी माहिती पीपल्स रिपब्लिकन पार्टी बीड जिल्हाध्यक्ष समाजभूषण अनिल तुरुकमारे यांनी निवेदाद्वारे माहिती दिली आहे. मोर्चातील प्रमुख मागण्या बीड जिल्ह्यातील कसत असणाऱ्या शेतकऱ्यांना सातबारा तात्काळ देण्यात यावा. गायरान धारक शेतकऱ्यांच्या सातबारा वरील पोट खराब शब्द काढुन त्यांना खरीप, रब्बी, पिक विमा भरण्याचा व राष्ट्रीयकृत बँकेकडुन पिककर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा करुन पंतप्रधान कृषी सन्मान निधीचा व इतर शासनाच्या सर्वयोजनेचा लाभ देण्यात यावा.महात्मा फुले महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ संत रोहिदास चर्मकार महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ, अपंग महामंडळाला तात्काळ निधी देऊन प्रस्ताव दाखल केलेल्या लाभार्थीचे प्रस्ताव तात्काळ मंजुर करण्यात यावेत.

 शासकीय जागेवर घरे बांधुन राहणाऱ्या शहरातील, ग्रामीण भागातील नागरीकांना पी.टी.आर.देऊन शासनाच्या इतर योजनेचा लाभ देण्यात यावा.भटके विमुक्त आदिवासी समाजातील नागरीकांच्य विकासासाठी स्वतंत्र आराखडा करावा. पारधी, भिल्ल समाजातील बांधवाना शासनाने जात प्रमाणपत्रासाठी अडवणुक करण्यात येऊ नये व तात्काळ जात प्रमाणपत्र देण्यात यावे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सुतगिरणी बोगस बनावट असुन विद्यार्थी, विद्यार्थीनी, नौकरीदार यांचे परस्पर जात वैधता प्रमाणपत्र घेऊन वस्त्रउद्योगाचे 27 कोटी, समाजकल्याणचे 14 कोटी ऊचलुन शासनास फसवले याची उच्च पातळीवर चौकशी करण्यात येऊन मुख्यप्रवर्तक संगिता ठोंबरे व चेअरमन विजय प्रकाश ठोंबरे विरुध्द 420 चा गुन्हा दाखल करुन त्यांची सर्व मालमत्ता जप्त करण्यात यावी. केज पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सुतगिरणी चौकशी प्रकरणी वरिष्ठांचे आदेश पायदळी तुडवत आहेत. त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी. बीड नगर परिषदने स्वच्छता टेंडर बंद करुन शहरात सफाई काम करणाऱ्या शेकडो महिलांना कामावरुन कमी केल्यामुळे शहरात घाणीचे साम्राज्य वाढले आहे. तरी त्यांना तात्काळ कामावर घेण्यात यावे.संत भगवान बाबा समाज कल्याण अंतर्गत ऊसतोड मजुरांच्या मुलांचे, मुलींचे वस्तीगृहात निकृष्ट जेवण दिले जात असुन सदरील प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी व टेंडर रद्द करण्यात यावे. बीड जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी पोस्टींग होऊनही अद्यापपर्यंत रुजु झाले नाहीत याची शासनाने तात्काळ दखल घ्यावी. या मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चात सहभागी व्हा असे आवाहन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष समाजभूषण अनिल तुरूकमारे यांनी केले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी