वकील संघ पाटोदा येथे ई- फायलिंग व फॅसिलिटी सेंटरचे उद्घाटन संपन्न
पाटोदा (गणेश शेवाळे) वकील संघ पाटोदा येथे ई फायलिंग व फॅसिलिटी सेंटरचे उद्घाटन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा चे माजी अध्यक्ष तथा विद्यमान बार कौन्सिलचे सदस्य सन्माननीय प्रसिद्ध वकील अँड.व्ही.डी.साळुंके साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख पाहुणे म्हणून पाटोदा न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आदरणीय श्रीमती एस.एन. निकम मॅडम,सह दिवाणी न्यायाधीश आदरणीय श्रीमती ए.ए.पाटील मॅडम ,औरंगाबाद उच्च न्यायालयाचे वकील संघाचे अध्यक्ष अँड.एन.एल जाधवसाहेब,ई-फायलिंग जिल्हा समन्वयक अॅड.मायकर साहेब, पाटोदा तालुका वकील संघाचे सन्माननीय अध्यक्ष अँड.सुशील कोठेकर साहेब,वकील संघाचे उपाध्यक्ष अँड.सुधीर घुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड. सुशील कोठेकर यांनी केले,सर्व प्रमुख मान्यवरांनी शुभेच्छा पर मार्गदर्शन केले.सुत्रसंचलन अँड.सुधीर घुमरे यांनी केले तर आभार प्रदर्शन अँड.संभाजी कोकाटे यांनी केले.
यावेळी पाटोदा तालुका वकील संघाचे सर्व सन्माननीय सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment