लिंबागणेश येथे मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषणास सुरूवात,राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी
लिंबागणेश येथे मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषणास सुरूवात,राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी :- डॉ.गणेश ढवळे
लिंबागणेश:- मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना अंतरवली सराटी याठिकाणी आमरण उपोषण दरम्यान मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना दिलेली मुदत २४ आक्टोबर रोजी संपली असुन कोणताही निर्णय न घेतल्यामुळे मराठा समाजामध्ये विश्वासघात केल्याची भावना समाजामध्ये असुन मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लिंबागणेश जिल्हा परिषद सर्कल मधील सकळ मराठा समाजाने आज दि.२५ आक्टोबर पासुन साखळी उपोषणाला सुरुवात केली असुन यादरम्यान सर्वपक्षीय राजकीय पुढा-यांना गावबंदी करण्यात आली असुन तशाप्रकारचे निवेदन जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री, प्रधान सचिव, गृहमंत्री यांना पाठवण्यात आले आहे. बेलेश्वर संस्थानचे मठाधिपती ह.भ.प.तुकाराम महाराज यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत श्रीफळ फोडुन साखळी उपोषणाला सुरुवात झाली.यावेळी लिंबागणेश मुळुकवाडी,बेलगाव,मसेवाडी, सोमनाथवाडी, पोखरी (घाट),पिंपरनई, मोरगाव, पाटोदा,बेलखंडी, नागझरी,करचुंडी गावातील मराठा समाज बांधव उपस्थित होते.
राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी
---
मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकप्रतिनिधी मराठा कुणबी आरक्षण संदर्भात स्पष्ट भुमिका न मांडल्याने तसेच महाराष्ट्र सरकारने दिलेला शब्द न पाळल्यामुळे यांच्या निषेधार्थ येणाऱ्या निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याची घोषणा करत सर्वच पक्षांच्या राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केली असुन तसा आशयाचे गावच्या वेशीवर दर्शनी भागात होर्डिंग्ज लावलेले आहेत.
साखळी उपोषण संदर्भात बेलेश्वर संस्थान येथे बैठक संपन्न
----
लिंबागणेश जिल्हा परिषद सर्कल मधील मराठा समाज बांधवांची दि.२४ मंगळवार रोजी बेलेश्वर संस्थान याठिकाणी जिल्हा परिषद सर्कल मधील लिंबागणेश गणातील लिंबागणेश जिल्हा परिषद सर्कल मधील लिंबा गणेश,मसेवाडी,मुळुकवाडी, बेलगाव, सोमनाथवाडी, पोखरी,पिंपरनई , मोरगाव, पाटोदा,बेलखंडी, नागझरी,करचुंडी तसेच च-हाटा पंचायत समिती गणातील च-हाटा, मेंगडेवाडी, जाधववाडी,धुमाळवाडी, गवळवाडी,पालवन,काकडहीरा, तळेगाव,वरवटी, धानोरा, पिंपळवाडी,कान्हेगाव,भाळवणी,सुर्याची वाडी,देव-याची वाडी, कदमवाडी,डोकेवाडा,वाळेकरवाडा येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व समाज बांधव उपस्थित होते.यावेळी उपोषणाविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.लिंबागणेश गणातील लिंबागणेश येथे व च-हाटा गणातील च-हाटा येथे साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Comments
Post a Comment