विजया दशमीला विद्यानगर, सांकवाळ, दक्षिण गोवा, येथे भगवा ध्वजारोहण आणि सोनं लुटने कार्यक्रम संपन्न

 


 दसरा सण मोठा निमित्ताने आपट्याची पाने सोनं म्हणून लुटणे आणि छत्रपतींच्या भगव्या झेंडा फडकावून आनंद व्यक्त करणे हा शानदार छोटासा सोहळा विद्यानगर येथील वरिष्ठ आणि कनिष्ठ यांच्या उपस्थितीत उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य सेवक मंडळ विद्यानगर, सांकवाळ गोवा आयोजित दाबोळी विमानतळ ते मडगाव राजमार्गावरील एम ई एस महाविद्यालय बसस्थानक चौकात भगवा ध्वजारोहण सन्माननीय श्री बस्तवाडकर सर ( सेवानिवृत्त सरकारी विद्यालयाचे मुख्याध्यापक ) आणि सन्माननीय श्री पी ए बोरगावे सर ( सेवा निवृत्त महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण अधिकारी ) यांच्या उपस्थितीत करण्यात आले . नवरात्र उत्सव देशात सर्वत्र साजरा केला जातो आणि दहाव्या दिवशी सीमोल्लंघन करून आपट्याच्या पानाला सोनं म्हणून स्वीकारले जाते . जवळच्या शेजारी राज्यात ( महाराष्ट्र आणि कर्नाटक ) छत्रपतींचे मावळे भगव्या झेंड्याची दौड ( प्रभात फेरी/ मिरवणूक ) काढून विजयाची पताका फडकवली जाते.भगवाध्वज हे आपलं स्वांस्कृतीक, धार्मिक आणि स्वातंत्र्य संग्रामाचे प्रतिक मानले जाते.आणी म्हणून वरिष्ठ आणि कनिष्ठ यांच्या उपस्थितीत भगवा ध्वजारोहण कार्यक्रम मुरगाव ( संभाजीनगर ) येथील विद्येचे माहेरघर असलेल्या विद्यानगर, सांकवाळ दक्षिण गोवा येथे प्रथमच आयोजन करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष श्री राजाराम पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि देश परकियांच्या राजवटीतून मुक्त करण्यासाठी छत्रपती शिवरायांनी भगवा ध्वज घेवूनच लढाया केल्या आणि जिंकल्या देखील आणि म्हणूनच आपली संस्कृती टिकून राहीली असे प्रतिपादन प्रमुख अतिथी या नात्याने आपलं मनोगत व्यक्त करताना मा श्री बस्तवाडकर सर यांनी सांगितले. मराठा सेवा संघाचे गोवा राज्याचे अध्यक्ष श्री रामचंद्र पाटील यांनी आपल्या मधूर वाणीने सुत्रसंचलन केले. वरिष्ठासह कु पुष्पराज यादवेश घोंगे आणि कु वैभव रामचंद्र पाटील यांची उपस्थिती देखील मोलाची ठरली कारण सदर सोहळ्याच चित्रीकरण अतिशय उत्तम प्रकारे केले. आणि भविष्यात भगवा ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्याचे काम हे त्यांचेच आहे असे विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले श्री पी ए बोरगावे सर ( माजी हाविद्यालयाचे शारिरीक शिक्षण अधिकारी) यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले. खालील शिवप्रेमी चे आभार मंडळाचे कोषाध्यक्ष श्री अमोल कोळी यांनी मानले.
 १) श्री के एस पाटील
 २) श्री चंद्रकांत वाणी
 ३) श्री अर्जुन कामाण्णाचे
 ४) श्री पांडुरंग कोरगावकर
 ५) श्री बस्तवाडकर सर
 ६) श्री. पी ए बोरगावे सर
 ७) श्री यादवेश घोंगे
 ८) श्री तानाजी फडके
 ९) कु वैभव रामचंद्र पाटील
 १०) कु पुष्पराज यादवेश घोंगे
 ११) श्री ओंकार देसाई
 १२) श्री अजय गुरव
 १३) श्री तानाजी राजपूत
 १४) श्री सुनील सपकाळ
 १५) श्री यशवंत राजपूत
 १६) श्री अमोल कोळी
   १७) रामचंद्र पाटील
  १८) श्री राजाराम पाटील आणि इतर शिवप्रेमी
  तदनंतर आपट्याच्या पानाला सोनं म्हणून " सोनं घ्या आणि सोन्या सारखे रहा" असं म्हणत या सोहळ्याची सांगता झाली

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी