बीड तालुक्यातील मुळुकवाडी येथिल वयोवृद्धांना पुतण्याने कोयत्याने तोडले ;गंभीर जखमींना रूग्णालयात हलवले
आज दि.26 नोव्हेंबर शनिवार रोजी सकाळी ७ वाजता मौजे. मुळुकवाडी ता.जि.बीड येथील वयोवृद्ध
बळीराम मसाजी निर्मळ वय ८० वर्षे,केसरबाई बळिराम निर्मळ वय ७० वर्षे यांच्यावर पुतण्य् रोहीदास विठ्ठल निर्मळ वय ५० वर्षे याने जमिनीच्या वादातून कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. दोघांना ग्रामस्थांनी रूग्णवाहिकेतुन जिल्हारूग्णालयात पाठवण्यात आले.
नेकनुर पोलीस स्टेशन एपीआय शेख मुस्तफा यांना फोनवरून कल्पना दिली असून लवकर घटनास्थळी येतो म्हणाले.
Comments
Post a Comment