महाराष्ट्र शासनाच्या "दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी" अभियानासाठी डॉ. संतोष मुंडेंची उपाध्यक्ष पदी निवड
ना. धनंजय मुंडे यांचे डॉ. संतोष मुंडेंनी मानले विशेष आभार परळी वैजनाथ (प्रतिनिधी ) महाराष्ट्र शासनाच्या "दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी" अभियानासाठी डॉ. संतोष मुंडेंची उपाध्यक्ष पदी निवड झाल्याचा शासन निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री धनंजय मुंडे व महाराष्ट्र शासनाच्या "दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी" अभियानाचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या प्रयत्नांतून निवड झाल्याबद्दल डॉ. संतोष मुंडेंनी आभार मानत अजून जोमाने दिव्यांग कल्याण्यासाठी काम करत राहू असा निर्धार व्यक्त केला सातत्याने ना. धनंजय मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली समाजातील दिव्यांग, निराधार, विधवा आदी वंचित घटकांना न्याय मिळावा यासाठी डॉ. संतोष मुंडे हे सातत्याने कार्यरत असतात. आपल्या निवडीबद्दल ना. धनंजय मुंडेंचे विशेष आभार डॉ. संतोष मुंडेंनी मानले. *कोण आहेत डॉक्टर संतोष मुंडे?* मुळचे नाथऱ्याचे असलेले डॉ. संतोष मुंडे हे पेशाने डॉक्टर आहेत. मुळातच समाजकार्याचे बाळकडू आणि सामाजिक से...