पुढारी गावात आलाच तर लाठ्या काठ्याचा प्रसाद देऊ - रोहन दादा गलांडे.
तालुक्यात अनेक गावांमध्ये मराठाआरक्षण मिळेपर्यंत पुढाऱ्यांना गाव बंदी !
केज/प्रतीनिधी
केज तालुक्यातील चिंचोली माळी ,केवड,वरपगाव,ढांकेफळ,येवता ,सोनसांगवी,भालगाव, जाधव जवळा अशा अनेक गावांमध्ये सकल मराठा आरक्षणाचा निर्णय जोपर्यंत होत नाही. तोपर्यंत आजी-माजी आमदार, राजकीय पुढारी यांना गावबंदी असेल असा निर्णय केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील येथील नागरिकांनी २५ ऑक्टोबर रोजी सकाळी सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आला.मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. मराठा समाजांचा आरक्षणाचा लढा सुरू आहे. या आरक्षणाच्या लढाईमुळे अनेक राजकीय नेत्यांची चांगलीच कुचंबणा झाली आहे. अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांना विविध समाजाच्या रोषाला बळी पडावे लागत आहे. काही ठिकाणी राजकीय नेत्यांसह आमदार, खासदार आणि राजकीय लोकप्रतिनिधी यांना गावबंदी करण्यात आली आहे.केज तालुक्यातील चिंचोली माळी व अनेक गावांमध्ये आता सकल मराठा समाजाच्या वतीने बॅनर लावून राजकीय नेत्यांना गावबंदी घालण्यात आली आहे.
जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आजी-माजी आमदार, राजकीय पुढारी यांना गावबंदी असेल असं गावाच्या लोकांनी जाहीर केलं आहे. सरसकट मराठ्यांना ओबीसीतून, ५० टक्क्यांच्या निकषाच्या आत बसवून आरक्षण द्यावे. अशा आशयाचा भला मोठा बॅनर गावात लावण्यात आले आहे. यामुळे आता राजकीय नेत्यांना गावात जाणे मुश्किल होणार आहे. दरम्यान याबाबत ग्रामपंचायतने सुध्दा लेखी ठराव पारित केले असून हा निर्णय सकल मराठा समाजाच्या युवक तसेच ग्रामस्थांनी घेतला. असल्याची माहिती देण्यात केज तालुक्यातील अनेक गावांमधुन देण्यात आली आहे. एवढ्यातुन पुढारी गावात आलाच तर त्याला लाठ्या काठ्या प्रसाद देऊ असे मराठा योद्धे रोहन गलांडे पाटील यांनी सांगितले आहे.
Comments
Post a Comment