Posts

बीड तालुक्यातील मुळुकवाडी येथिल वयोवृद्धांना पुतण्याने कोयत्याने तोडले ;गंभीर जखमींना रूग्णालयात हलवले

Image
आज दि.26 नोव्हेंबर शनिवार रोजी सकाळी ७ वाजता मौजे. मुळुकवाडी ता.जि.बीड येथील वयोवृद्ध  बळीराम मसाजी निर्मळ वय ८० वर्षे,केसरबाई बळिराम निर्मळ वय ७० वर्षे यांच्यावर पुतण्य् रोहीदास विठ्ठल निर्मळ वय ५० वर्षे याने जमिनीच्या वादातून कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. दोघांना ग्रामस्थांनी रूग्णवाहिकेतुन जिल्हारूग्णालयात पाठवण्यात आले.  नेकनुर पोलीस स्टेशन एपीआय शेख मुस्तफा यांना फोनवरून कल्पना दिली असून लवकर घटनास्थळी येतो म्हणाले. 

यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

Image
नाथ शिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या शिक्षणा सोबतच क्रीडा व कलेला प्राधान्य देते - प्रदीप खाडे    परळी वैजनाथ (प्रतिनिधी ) :-   नाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नाथ शिक्षण संस्था ही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या सोबतच विद्यार्थ्यांमध्ये असलेला क्रीडा आणि कलागुणांना प्राधान्य देऊन त्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने कार्य करत आहे असे मनोगत यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय येथील क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कारा प्रसंगी नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडे यांनी व्यक्त केले.   क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड व गटशिक्षणाधिकारी कार्यालय परळी वैजनाथ त्यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित क्रीडा स्पर्धेमध्ये नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्हा मल्लखांब स्पर्धेत व तालुका क्रिकेट स्पर्धेत विजय संपादन केल्याबद्दल यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात नाथ शिक्षा संस्थेच्या सहसचिव प्...

जी-20 शिखर परिषदेच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

Image
औरंगाबाद,( प्रतिनिधी ):- जी-20 राष्ट्रसमुहाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने शिखर परिषदेचे प्रतिनिधी 13 व 14 फेब्रुवारी 2023 रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा, वेरुळ लेणी आणि इतर विविध स्थळांना भेटी देणार आहेत. या परिषदेच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय यांनी आज आढावा घेतला.   जिल्हाधिकारी कार्यालयात जी-20 शिखर परिषदेच्या नियोजनासाठी पूर्वतयारी बैठकीस महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे उपस्थित होते.  जी-20 परिषदेचे सहभागी प्रतिनिधी 13 व 14 फेब्रुवारी 2023 रोजी औरंगाबाद शहराला भेट देणार आहेत. वेरूळ, अजिंठा, दौलताबाद येथील पर्यटन तसेच औद्योगिक क्षेत्रातील प्रगतीचीही पाहणी करणार आहेत. जगभरातील सुमारे 500 प्रतिनिधी औरंगाबाद येथे भेट देणार आहेत. या प्रतिनिधींच्या निवास, सुरक्षा, वाहतूक तसेच इतर अनुषंगिक व्यवस्थेसोबतच वेरुळ, अजिंठा येथील सोईसुविधा, रस्त्यांची देखभाल दुरूस्ती, रस्त्यांवरील सूचना...

26 नोव्हेंबर रोजी बीड मध्ये भारतीय संविधान गौरव रॅलीचे आयोजन

Image
बीड(प्रतिनिधी):- भारतीय संविधान गौरव दिनानिमित्त दिनांक 26 नोव्हेंबर रोजी बीडमध्ये संविधान गौरव रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली आहे. बीडमध्ये 26 नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. 26 तारखेला सकाळी 8:30 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे अभिवादन करण्यात येणार आहे. यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात येणार आहे. संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करून संविधान गौरव रॅलीचा प्रारंभ होणार आहे.सदरील रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा - माळी वेस - साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा - छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन बीड येथे रॅलीची सांगता होणार आहे. सकाळी 10:30 ते 11:30 या वेळेत भारतीय संविधानाची अंमलबजावणी या विषयावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष निवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही.बनसोडे यांची उपस्थिती असणार आहे. प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा.डॉ. विठ्ठल जाधव यांना आमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती भारतीय संविधान ग...

प्रशांत आष्टीकर विरोधात बीड जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार

Image
बीड/प्रतिनिधी :-अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त माननीय *श्री.एस.एस.देशमुख सर* आणि मराठी पत्रकार परिषदेच्या बद्दल फेसबुक,वाटस अप आदि समाज माध्यमावर प्रशांत आष्टीकर या विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीने अवमान कारक तसेच मानहानीकारक अशा पोस्ट समाज माध्यमावर प्रसारित केल्या आहेत. म्हणून प्रशांत आष्टीकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा.अशा मागणीची रितसर तक्रार *बीड जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर* यांच्या कडे डिजिटल मिडिया परिषद आणि मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख सर व त्यांचे कुटुंबीय व मराठी पत्रकार परिषदेबद्दल फेसबुक आणि वाटस अप वरुन बदनामी करणा-या पोष्ट विकृत मनोवृत्तीच्या प्रशांत आष्टीकर याने केल्या आहेत.या प्रकाराचा राज्यभरात मराठी पत्रकार परिषदेकडून निषेध केला जात असुन मुंबई पुण्यासह राज्यभरात आष्टीकर विरोधात गुन्हे दाखल करण्यात यावे अशा तक्रारी पोलिसांकडे दाखल करण्यात येत आहेत.त्या नुसारच आज दिनांक 24 ऑक्टोबर 2022 रोजी डिजिटल मिडिया परिषद आणि बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्...

महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने भारतीय संविधान दिनानिमित्त संविधान शाहिरी जलसाचे आयोजन

Image
नाशिक (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने भारतीय संविधान दिन साजरा होत असून दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी १२:०० वा.येथील परशुराम सायखेडकर नाट्यगृह शालिमार,नाशिक येथे विविध सांस्कृतिक व वैचारिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव संयोजक सौरभ विजय (भा.प्र.से) व संचालक विभीषण चवरे,कार्यक्रम अधिकारी संदीप शेंडे यांनी दिली आहे.       भारतीय संविधानातील सार्वभौम, समाजवादी,धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य,नागरिकांना सामाजिक,आर्थिक,राजकीय न्याय,स्वातंत्र्य,समानता,बंधुता, वैज्ञानिक दृष्टीकोन तत्व विचार लोकमानसात रुजविण्याच्या हेतूने भारतीय संविधानाच्या सरनाम्याचे वाचन व विवेचन सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कटारे करणार असून भारतीय संविधान शाहिरी कला अभियान तथा लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान कलापथक प्रा.शरद शेजवळ आंबेडकरी शाहिरी जलसा अंतर्गत संविधान प्रचार,प्रसार व संवर्धन गीतांचे सादरीकरण करणार होणार आहे. शा. बाबुराव वाघमारे व संच भीमगीतांचे सादरीकरण होईल सां...

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन-ॲड. संजय रोडे

Image
दि.26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त डॉ.आंबेडकर पुतळा रेल्वे स्टेशन येथे भव्य कार्यक्रम.     परळी- दि.24.(प्रतिनिधी)     वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येत्या 26 नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिनानिमित्त येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा रेल्वे स्टेशन येथे भारतीय संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सहसचिव ॲड. संजय रोडे यांनी दिली आहे.      भारतीय संविधानामुळेच भारत हा आजही एकसंघ असून संविधानाच्या प्रत्येक कलमांमध्ये नागरिकांचे मूलभूत हक्क समाविष्ट असल्याकारणामुळे देशातील प्रत्येक नागरिकांस आपले जीवन सुखी व आनंदाने जगण्यास मुभा मिळाली आहे.     हे समतेचे व न्यायिक जीवन जगत असताना काही असामाजिक व मनुवादी विचाराची माणसे संविधान बदलण्याची भाषा करीत असून त्यांना स्वातंत्र्य समता बंधुत्व व न्याय या मानवी मूल्यांची जोपासना नको असल्याने व आपल्याच समूह, वर्गाचे प्राबल्य सर्वच क्षेत्रात असावे असे वाटत असल्यामुळे आज देशामध्ये या विषमतावादी शक्ती अराजकता निर्माण करण्याचे काम करत...