वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुक्याच्या वतीने शहरात विजय मंडल दिवस साजरा
वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुक्याच्या वतीने शहरात विजय मंडल दिवस साजरा....
प्रतिनिधी (गेवराई ) गेवराई येथीलडॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बी. पी. मंडल व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विजय मंडल दिवस वंचित व ओबीसीच्या वतीने साजरा करण्यात आला
मंडल_आयोग म्हणजे दुसरा मागासवर्ग आयोग 1 जानेवारी 1979 रोजी जनता पक्षाचे पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी मंडल आयोगाची स्थापना केली.
बी. पी. मंडल बिहारचे माजी मुख्यमंत्री. म्हणूनच याला "मंडल आयोग" म्हणतात.
7 ऑगस्ट 1990 रोजी तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारसी केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये लागू केल्या.
यानुसार केंद्र सरकारच्या नोकऱ्या आणि शिक्षणात OBC साठी 27% आरक्षण सुरू झाले.
देशातील इतर मागासवर्ग OBC साठी केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये 27% आरक्षण देणे बंधनकारक झाले.
मंडल आयोग लागू करुन घेण्यासाठी श्रध्येय अॆड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी केंद्रीय मंत्री पदा चा नकार दिला व संसदेत राज्यसभेचे खासदार असतांना पूर्ण ताकद लावली, मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करुन घेण्यासाठी प्राण पणाला लावले होते.गेवराई वंचितचे मा.तालुका अध्यक्ष अजय कुमार (पप्पु) गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये शहरात मोठ्या उत्सहात विजय मंडल दिवस साजरा करण्यात आला ओबीसी समूहामध्ये जनजागृती करून साजरा करण्यात आला यावेळी कार्यकर्मास तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष प्रा विष्णू जाधव सर ओबीसी नेते राजाभाऊ पोकळे मा तालुका महासचिव किशोर भोले प्रसिध्दी प्रमुख ज्ञानेश्वर हवाले ओबीसी नेते किशोर चौधरी बलभिम बारगजे बजरंग सानप सुनिल ढाकणे वचिष्ठ कावळे सुदेश पोतदार किशोर चव्हाण राजाभाऊ हराळे मिलिंद तायड रामेश्वर चव्हाण सुधाकर ञिभुवन कृष्णा हातागळे सह ओबीसी बांधव व कार्येकर्ते उपस्थित होते
Comments
Post a Comment