पाटोद्यातील इतर सर्व समाज मंदिरांचा जीर्णोद्धार झाला; मग संत सावता महाराज मंदिराला निधी का नाही?

पाटोद्यातील इतर सर्व समाज मंदिरांचा जीर्णोद्धार झाला; मग संत सावता महाराज मंदिराला निधी का नाही?

लवकर निधी उपलब्ध करून सावता महाराज मंदिराचा कायापालट करावा – गणेश शेवाळे
पाटोदा (प्रतिनिधी) पाटोदा शहरातील इतर समाज मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी निधी उपलब्ध होऊन विविध कामे करण्यात आली आहेत. मात्र संत शिरोमणी सावता महाराज मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी अद्याप अपेक्षित निधी उपलब्ध झालेला नसल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.संत सावता महाराज हे कष्टकरी, शेतकरी आणि वारकरी समाजाचे श्रद्धास्थान आहेत. पाटोदा शहरातील संत सावता महाराज मंदिरात दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे मंदिराचा जीर्णोद्धार तसेच परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी विशेष निधी मंजूर करण्याची गरज आहे.पाटोदा शहरातील इतर समाज मंदिरांचा जीर्णोद्धार होत असताना संत सावता महाराज मंदिरही या सुविधांपासून वंचित राहू नये. मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी लोकप्रतिनिधी आणि नगरपंचायत प्रशासनाने तातडीने पुढाकार घेऊन आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी गणेश शेवाळे यांनी केली आहे.“संत सावता महाराज मंदिर हे भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. इतर समाज मंदिरांप्रमाणे या मंदिराचाही जीर्णोद्धार झाला पाहिजे. लवकरात लवकर निधी उपलब्ध करून मंदिराचा कायापालट करावा,” अशी मागणी गणेश शेवाळे यांनी केली.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी