स्व. अजितदादा पवार यांच्या बीड जिल्ह्यातील पहिल्या पुतळा उभारणीच्या कामाला वेग
स्व. अजितदादा पवार यांच्या बीड जिल्ह्यातील पहिल्या पुतळा उभारणीच्या कामाला वेग
जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक; विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती
बीड प्रतिनिधी :
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या बीड जिल्ह्यातील पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी परळी शहरात करण्यात येणार असून, या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला आता वेग आला आहे. पुतळा उभारणीसंदर्भातील विविध, तांत्रिक मान्यता व प्रशासकीय बाबींचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला संबंधित विभागांचे अधिकारी, परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख, तसेच सप्तशृंगी दुर्गा उत्सव सेवा संस्थेचे अध्यक्ष तथा पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत पुतळा उभारणीसाठी आवश्यक असलेली जागा, तांत्रिक बाबी, प्रशासकीय प्रक्रिया आणि इतर आवश्यक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी पुतळा उभारणीसंदर्भातील सर्व बारकावे अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आले. शासन स्तरावर या कामाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून येत्या काही महिन्यांत परळी शहरात स्व. अजितदादा पवार यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे नियोजन असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
या बैठकीस सप्तशृंगी दुर्गा सेवाभावी संस्थेचे संचालक गौतम आगळे तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी आणि संबंधित मान्यवर उपस्थित होते.
परळी शहरात उभारला जाणारा हा पुतळा स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याची आठवण जपणारा आणि भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी स्मारक ठरेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
Comments
Post a Comment