'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ' वर्धापनदिनानिमित्ताने बीड शाखेचा गीत जागर कार्यक्रम संपन्न
बीड प्रतिनिधी : - क्रांतिदिनी,९ ऑगस्ट,१९८९ रोजी शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुढाकाराने स्थापित 'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती'च्या बीड शाखेने शहराच्या मध्यवर्ती भागातील महात्मा ज्योतिबा फुले- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्या शेजारी संघटनेचे पदाधिकारी,समविचारी पक्ष-संघटनेचे प्रमुख,सामाजिक कार्यकर्ते यांनी जनजागृतीचे ,उदबोधक, स्फुर्तीदायी अशी 'चळवळीची गाणी' सामुदायिकपणे गात 'जन जागर अभियान' राबविले.
कार्यक्रमाच्या सर्वप्रथम विवेक वाहिनीच्या राज्य कार्यवाह प्राचार्य डॉ सविता शेटे,कॉ नामदेव चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य कॉ डी जी तांदळे, शाखा कार्या ध्यक्ष प्रा विजय घेवारे, व्यसनमुक्ती विभागाचे प्रमुख बाजीराव ढाकणे, सामाजिक कार्यकर्ते दत्ता प्रभाळे, शुभांगी कुलकर्णी, संपादक शेखर कुमार,कौशल्या बावणे यांनी कृतिशील समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
डॉ सविता शेटे, कॉ नामदेव चव्हाण, कॉ डी जी तांदळे, शेखर कुमार यांनी वर्तमानात बोकाळलेली भोंदूगिरी, भ्रामक फलज्योतिष्य, अन् कर्मकांडामुळे जनतेचे चालू असलेले सर्व प्रकारचे शोषण टाळण्यासाठी 'अंनिस' संघटनेची व 'जादूटोणा विरोधी कायद्या'च्या पोलिसांकरवी कठोरपणे अंमलबजावणीची,तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन व विवेकवादी विचार अन वर्तनाची नितांत गरज संक्षेपात अधोरेखित केली.
शेटे मॅडम,शुभांगी यांनी 'अभिवादन करुन तुम्हां डॉ दाभोलकर,जोमाने पुढे नेवू चळवळ' ; 'बुद्ध,कबीर,भिमराव,फुले,
या भुमीवर जन्मले';
'चला गड्यांनो पाऊल टाकू पुढ र,
उखडून टाकू अंधश्रद्धेची मुळ र';
'बोला आज मिळुनी सारे,ज्या ज्या घातक रुढी,दुष्ट प्रथा अन चाली, नष्ट करु या रे';
'आम्ही प्रकाशबीजे रुजवित चाललो,
वाटा नव्या युगाच्या रुळवीत चाललो';
ही व अशी गिते गायली.सर्व सहभागी कार्यकर्त्यांनी त्यांना उत्स्फूर्तपणे साथ दिली.
विधिज्ञ कॉ भीमराव चव्हाण यांनी साने
गुरुजींचे 'आता उठवू सारे रान,आता पेटवू सारे रान ' हे गीत गाऊन वाटसरुंना देखील सहभागी होण्यास स्फूर्ती दिली.
अखेरीस,प्रातिनिधिक स्वरूपात प्रेक्षक विद्यार्थी,शिक्षक,जेष्ठ नागरिकांना डॉ दाभोलकर,अंनिस, संविधान,"महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष ,अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अधिनियम-2013" अनुषंगाने प्रश्न विचारले.तीन प्रश्नांची बरोबर उत्तरे देणा-यांना उपयुक्त पुस्तके भेट दिली.
'हम होंगे कामयाब एक दिन... ' चे सामुहिक गायनाने कार्यक्रमाचा समारोप झाला. संजय तांदळे, बाजीराव ढाकणे,
नितीन जायभाये, पाशा भाई पटेल यांनी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले. संघटनेचे किरण घाटगे, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ नाईकवाडे, अशोक भाऊ, रविंद्र मुंडे,शहादेव मिसाळ यांच्यासह महिलांची देखिल लक्षणिय उपस्थिती होती.
अभियानाची गरज,प्रास्ताविक व संचलन प्राचार्य डी जी तांदळे यांनी केले. भीमराव चव्हाण यांनी सर्वांचे आभार मानले.
Comments
Post a Comment