उघड हाथ पाय काढण्याची भाषा करणाऱ्याला अटक कधी, दुबाले याचा जाहीर निषेध-डॉ.जितीन वंजारे
बीड प्रतिनिधी :- भर मीडिया समोर हाथ पाय काढण्याची खून करण्याची भाषा करणारा पोलीस बॉईज संघटनेचा मोरख्या राहुल दुबाले याला पोलीस प्रशासनाने योग्य वेळी मुसक्या आवळा, त्याला अटक करा कारण त्याच्या चिथावणींखोर वक्ताव्यामुळे महाराष्ट्रात शिव शाहू फुले आंबेडकरी विचारांच्या आणि अभिजित दिपके यांच्या समर्थकांत असंतोषीचं वातावरण तयार झाले आहे.अभिजित दिपके यांच्या घरासमोर हजारो पोलीस आजपर्यंत येऊन गेले वेगवेगळे नेते अधिकारी पदाधिकारी येऊन गेले पोलिसांना चहा नास्ता जेवण पुरवताना अभिजित दिसलं फक्त एक पीएसआय ज्याने भेटायला येणाऱ्या लोकांना अपमानस्पद वागणूक दिल्या कारणाने आणि अभिजित यांना अडवल्याने त्या पी एस आय वर अभिजित दिपके भडकले याचा उहापोह करणारा संधीसाधू पोलीस बॉईज वाला रस्त्यावर उतरू देणार नाही, हाथ पाय काढू अशी भाषा करत आहे.त्याच्यावर योग्य कार्यवाही करून त्याला अटक करा नसता आम्ही रस्त्यावर उतरू असा ईशारा सामाजिक कार्यकर्ते डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी दिला आहे.
पोलीस प्रशासन हे भारतीय न्याय संहितेचे रक्षक असतात संरक्षण देण हे त्याच नैतिक कर्तव्य पण दिल्ली पोलिसांनी अमानुष हाणमार करून विद्यार्थ्यांना जखमी केल, इज्जतीवर हात टाकला तेंव्हा पोलीस बॉईज वाला उबाळे कुठे होता? तेंव्हा नाही का दिसला पोलिसांनाचा अत्याचार अन्याय रक्षक भक्षक झालेले आणि आता त्याला पुळका आलेला दिसतो आहे. अरे पोलिसांचा अपमान करायचा असता तर अभिजित ने सगळ्यांना असच वागला असता तिथे रोज शिफ्ट बदलून शेकडो पोलीस अधिकारी पदाधिकारी येतात त्यांना कोणालाच अभिजित काही बोलला नाही मग या पी आय ने भेटण्यावाचून अडवल्याने त्याला अभिजित दिपके बोलले.याची पार्शभूमी लक्षात न घेता आम्ही असं करू तस करू, हाथ-पाय तोडू, रस्त्यावर फिरू देणार नाही अशी असंविधानिक भाषा करणारा राहुल दुबाले आणि त्याचे कार्यकर्ते अभिजित दिपके यांच्यावर हल्ला करू शकतात आणि म्हणून त्याला अटक करून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि अभिजित दिपके यांचे मेव्हणे डॉ.जितीन वंजारे यांनी केली
Comments
Post a Comment