महिला उद्योजकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी बीडमध्ये ‘तेजस्विनी’तर्फे भव्य प्रदर्शनाचे आयोजन; ८ व ९ ऑगस्ट रोजी रामकृष्ण लॉन्स येथे भरणार महिला उद्योजकांचा मेळा!

महिला उद्योजकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी बीडमध्ये ‘तेजस्विनी’तर्फे भव्य प्रदर्शनाचे आयोजन; ८ व ९ ऑगस्ट रोजी रामकृष्ण लॉन्स येथे भरणार महिला उद्योजकांचा मेळा!
बीड (प्रतिनिधी):
आगामी नागपंचमी आणि रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर महिला उद्योजकांच्या हाताला काम आणि त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ‘तेजस्विनी ग्रुप’च्या वतीने दोन दिवसीय भव्य वस्तू प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन येत्या शनिवारी आणि रविवारी (दि. ८ व ९ ऑगस्ट २०२६) कॅनॉल रोडवरील रामकृष्ण लॉन्स येथे भरवले जाणार आहे.
तेजस्विनी ग्रुपच्या संस्थापिका सोनल अरविंदसिंह पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रदर्शनात बीड जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील अनेक महिला उद्योजक सहभागी होणार आहेत. यामध्ये सण-उत्सवाच्या खरेदीसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंचे स्टॉल्स उपलब्ध असतील.
प्रदर्शनातील मुख्य आकर्षणे:
प्रदर्शनात महिलांसाठी खास मनमोहक पैठणी, ब्रँडेड साड्या, डिझायनर कुर्तीज, लेडीज वेअर्स, फ्रॉक्स, स्टोल, ओढणी यासह मोत्यांचे दागिने, फॅन्सी बांगड्या आणि सौंदर्य प्रसाधने उपलब्ध असणार आहेत. याशिवाय घरगुती बनावटीचे साबण, हेअर ऑईल, आयुर्वेदिक प्रोडक्ट्स, शुद्ध तूप, पंचगव्य नैसर्गिक उत्पादने, अगरबत्ती, तसेच घरगुती मसाले, लोणचे, विविध चटण्या आणि खमंग खाद्यपदार्थांची मेजवानी असणार आहे. देवांसाठी लागणारी वस्त्रे आणि चॉकलेट्सचे विशेष स्टॉल्स देखील आकर्षण ठरणार आहेत.
हे प्रदर्शन सकाळी १०:०० वाजेपासून नागरिकांसाठी खुले राहील. स्थानिक आणि ग्रामीण भागातील महिला व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच सणाची खरेदी एकाच छताखाली करण्यासाठी बीड शहरातील व जिल्ह्यातील नागरिकांनी सहकुटुंब या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजिका सोनल अरविंदसिंह पाटील यांनी केले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी