आम आदमी पार्टी बीड जिल्ह्याच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा




बीड प्रतिनिधी : आम आदमी पार्टी, बीड जिल्हा कार्यालय येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक अशोक येडे, जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी बीड हे होते. यावेळी बोलताना अशोक येडे यांनी स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारकांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण केले. ते म्हणाले, “क्रांतिकारकांच्या त्यागातून देशाला स्वातंत्र्य मिळाले. आता हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी तसेच स्वातंत्र्याचे खरे लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एका नव्या सामाजिक क्रांतीची गरज आहे.”

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ. किस्किंदा पांचाळ, जिल्हाध्यक्ष, बीड जिल्हा सुतार समाज यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “देशाला स्वातंत्र्य मिळून ८० वर्षे झाली, तरी शासनाच्या सर्व सुख-सुविधा व मूलभूत हक्कांचा लाभ प्रत्येक सर्वसामान्य नागरिकापर्यंत पूर्णपणे पोहोचलेला नाही. यासाठी समाजाने जागरूक होऊन आपल्या हक्कांसाठी पुढे येणे गरजेचे आहे.”

कार्यक्रमाचे नियोजन श्री. सय्यद सादेक, शहराध्यक्ष, आम आदमी पार्टी बीड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

यावेळी संजय गायकवाड, फारूक इनामदार, प्रा. गोकुळ गायकवाड, शेख सादेक, राहुल गायकवाड, आजम खान (तालुका उपाध्यक्ष), मिलिंद पाळणे (शहर सचिव), रफिक पठाण (जिल्हा उपाध्यक्ष) यांच्यासह आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांना अभिवादन करण्यात आले.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी