लिंबागणेश येथे गुलालमुक्त, डीजेमुक्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त पारंपरिक लेझीम-ढोलताशांच्या गजरात लक्षवेधी मिरवणूक
लिंबागणेश येथे गुलालमुक्त, डीजेमुक्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त पारंपरिक लेझीम-ढोलताशांच्या गजरात लक्षवेधी मिरवणूक!
डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे राज्याध्यक्ष अजिंक्य चांदणे यांची प्रमुख उपस्थिती; पारंपरिक पद्धतीने साजऱ्या झालेल्या मिरवणुकीने ग्रामस्थांचे वेधले लक्ष
लिंबागणेश ;-(दि.१४) : बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे आज (दि.१४) शुक्रवार रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त गुलालमुक्त आणि डीजेमुक्त पारंपरिक मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. रासायनिक आणि बनावट गुलालामुळे त्वचेला होणारे दुष्परिणाम तसेच डीजेच्या कानठळ्या बसविणाऱ्या गोंगाटाला पूर्णविराम देत पारंपरिक लेझीम, ढोल-ताशांच्या निनादात ही मिरवणूक काढण्यात आली.
सायंकाळी ५ वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातून मिरवणुकीला प्रारंभ झाला. आकर्षक फुलांनी सजवलेल्या रथावर विराजमान असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे राज्याध्यक्ष अजिंक्य चांदणे, अभिजित देवकुळे, मुकेश शिंदे, अभिजीत देडे, आप्पा लोंढे, शंकर कांबळे, बाळू कांबळे, उत्सव समितीचे अध्यक्ष दादा थोरात आणि बाळू थोरात, डॉ.गणेश ढवळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. श्रीफळ फोडून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समिती वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
अण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मारोती मंदिर आणि बाजारतळ या प्रमुख मार्गांवरून मिरवणूक काढण्यात आली. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच वयोगटातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. त्यामुळे गावात उत्सवी आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दादा थोरात, उपाध्यक्ष बाळू थोरात, सचिव अजित थोरात, कोषाध्यक्ष रमेश थोरात, सल्लागार धीरज थोरात, दामूअण्णा थोरात, उमेश थोरात, अशोक थोरात, राजेंद्र थोरात, अजय थोरात, पप्पू कांबळे, विनोद दुनघव, औदुंबर थोरात, राजेभाऊ थोरात, अरुण निर्मळ, अमोल वक्ते, निलेश गालफाडे, गणेश पवळ, राम थोरात, किरण थोरात, अमोल थोरात, पप्पू थोरात, अॅड. गणेश वाणी, बाळकृष्ण मुळे, सय्यद अख्तर, विनोद चौरे, प्रमोद रणखांब, सय्यद बशीर आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment