संपादक समीर काझी यांना 'महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई'चा मराठवाडा विभागीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर


बीड प्रतिनिधी :-महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठित 'मराठवाडा विभागीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार' ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक समीर काझी यांना जाहीर झाला आहे.
​पत्रकारिता क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनीय योगदान, सामाजिक बांधिलकी आणि निष्पक्ष पत्रकारितेची दखल घेऊन संघाच्या वतीने या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. समीर काझी यांच्या या यशामुळे पत्रकारिता क्षेत्रातून आणि सर्वस्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी