पंधरा वर्षाच्या संघर्षाला यश, अखेर होमिओपॅथी डॉक्टरांना एम एम सी ला नोंदणी मान्य-डॉ.जितीन वंजारे


बीड प्रतिनिधी :- जगामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक संकल्पना आहेत अनेक उपचार पद्धती आहेत परंतु होमिओपॅथी एक अशी उपचार पद्धती आहे जी जगभर मान्य आहे परंतु भारतामध्ये तिला राजाश्रय मिळाला नव्हता तसेच एम एम सी कौन्सिलला त्यांची वैद्यकीय पद्धत म्हणून नोंद नव्हती. होमिओपॅथीची वेगळीच स्वतंत्र सिसीएच कौन्सिल होती महाराष्ट्रासाठी एम सी एच होती.त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राच्या मेन स्ट्रीम मध्ये काही राज्यांमध्ये होमिओपॅथी या वैद्यकशास्त्राला एन एम सी रजिस्ट्रेशन दिलं जात नव्हतं परंतु गेल्या 14 वर्षाच्या अथक परिसरामध्ये वेगवेगळे आंदोलने,वेगवेगळी उपोषणे, वेगवेगळी लाक्षणिक बंद, वेगवेगळ्या रॅली या सर्वांमुळे अखेर वैद्यकीय क्षेत्रामध्ये एनएमसी कौन्सिल ला होमिओपॅथिक डॉक्टरांना सीसीएमपी नावाचा कोर्स केल्यानंतर रजिस्ट्रेशन चालू झालेले आहेत.यामध्ये मुंबई असो,दिल्ली असो किंवा प्रत्येक जिल्ह्यामधील जे काही आतापर्यंत आंदोलन झाले ज्या ज्या होमिओपॅथिक डॉक्टर नेत्यांनी ग्राउंड लेव्हल पासून ते दिल्लीच्या सभागृहापर्यंत होमिओपॅथिक डॉक्टरांचे प्रश्न सरकार दरबारी कायम तेवत ठेवून अखेर एनएमसीला नोंदणी करण्यासंदर्भात कायदा करून तो पारित केला आणि बहुसंख्य असलेले विशेषतः ग्रामीण भागामध्ये आरोग्य सेवा देणारे होमिओपॅथिक डॉक्टर यांची मान्यताप्राप्त एमएमसी ला नोंदणी झाली ही आनंदाची गोष्ट संबंध देशभर पसरत असून ज्या ज्या होमिओपॅथिक डॉक्टर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी आपला अमूल्य वेळ या आंदोलनामध्ये,लाक्षणिक बंद मध्ये, उपोषणामध्ये आणि तस्तम रस्त्यावरच्या लढाईमध्ये दिला त्या सर्व होमिओपॅथिक डॉक्टर नेत्यांचे व होमिओपॅथिक डॉक्टर कार्यकर्त्यांचे मी एक होमिओपॅथी डॉक्टर संघटनेचा सदस्य म्हणून आभार मानतो. 
        होमिओपॅथी डॉक्टरांना सरकारी सेवेत भरघोस जागा मिळाव्यात, शासकीय सेवेत त्यांना रुजू करून घ्यावे, मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात ग्रामीण भागात डॉक्टरांची गरज आहे पीएचसी,उपजिल्हा रुग्णालय, सिव्हिल हॉस्पिटल आणि चरिटेबल ट्रस्ट ला सरकारी सेवेतून होमिओपॅथी डॉक्टरांना जास्त प्रमाणात रुजू करावे या आणि अश्या अनेक मागण्या अजूनही प्रलंबित आहेत ह्या सर्वांसाठी डॉक्टरांचे एमएमसी ला रजिस्ट्रेशन असणं गरजेचं होत. होमिओपॅथी डॉक्टरांचं रजिस्ट्रेशन होमिओपॅथी कौन्सील मार्फत होते ती एक स्वातंत्र्य नियमावली आहे पण एमएमसी ला पण असावे असा अट्टाहास खूप वर्षांपासून होता पण आय एम ए या संघटनेने आम्हाला कायम विरोध केला. आलोपॅथी डॉक्टरांनी कायम विरोध केल्यामुळे आजपर्यंत प्रश्न मार्गी लागला नाही पण होमिओपॅथी डॉक्टर ग्रामीण भागात चांगली सेवा देतात,आओपॅथी डॉक्टरांचे मोठमोठे हॉस्पिटल मध्ये आर एम ओ म्हणून होमिओपॅथीक डॉक्टर चालतात, कोव्हीड मध्ये एमेर्जन्सी चालतात मग शासकीय सेवेत का नाही? आणि म्हणून हा लढा खूप महत्वाचा होता आज त्याला यश मिळालं याचा मनोमन आनंद होतो आहे असे उद्गार हिमा डॉक्टर संघटनेचे जिल्हा महासचिव डॉ जितीन वंजारे यांनी काढले.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी